India vs South Africa, T20 Record : भारत-दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका भारताने 3 पैकी 2 सामने जिंकत खिशात घातली असून आता औपचारिकता म्हणून तिसरा सामना खेळवला जात आहे. दरम्यान आजवरच्या इतिहासात भारताला दक्षिण आफ्रिकेवर भारतीय भूमीत टी20 मालिकेत मात देता आलेली नाही. पण यंदा रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने ही कमाल केली असून आता व्हाईट वॉश देण्याची नामी संधी भारताकडे आहे. तर या मालिकेतील अखेरच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...
भारत- दक्षिण आफ्रिका T20 Head to Head
टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं जड राहिल्याचं दिसून आलं आहे.यंदाच्या मालिकेतील दोन विजय पकडत भारताने 22 पैकी 13 सामन्यात विजय मिळवलाय. तर, दक्षिण आफ्रिका संघाला 8 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित देखील ठरला आहे.
कसं पाहाल सामन्याचं थेट प्रक्षेपण?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी20 सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याच लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह (दुखातग्रस्त), शाहबाज अहमद.
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.
अशी असू शकते भारताची अंतिम 11
सलामीवीर - रोहित शर्मा, केएल राहुल
मिडिल ऑर्डर फलंदाज - विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक,
ऑलराउंडर- अक्षर पटेल
गोलंदाज - अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल
हे देखील वाचा -