IND vs SA, 3rd T20, Weather Report : आज इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) हा सामना रंगणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील हा तिसरा आणि अखेरचा सामना (IND vs SA 3rd T20) आज खेळवला जात आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना 8 विकेट्सने जिंकला, तर दुसरा सामनाही 16 धावांनी जिंकत मालिकेत भारताने 2-0 ची विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतासाठी आजचा सामना हा फक्त व्हाईट वॉशच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तर दुसरीकडे साऊथ आफ्रिकेचा संघ अखेरचा सामना जिंकवून किमान मालिकेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील. या महत्त्वाच्या सामन्यावेळी नेमकी हवामानाची स्थिती कशी आहे, पाहूया...


Accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या सामन्यादरम्यान इंदोरचं स्टेडियम असलेल्या भागात पावसाची शक्यता नाहीये. सामना होणाऱ्या ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. पण पावसाची शक्यता जवळपास नाहीच आहे. त्यामुळे आज मैदानातील वातावरण चांगलं असल्याने एक मोठा स्कोर उभा राहू शकतो आणि एक संपूर्ण ओव्हर्सचा सामना आज क्रिकेट रसिकांना पाहायला मिळू शकतं. तापमानाचा विचार करता तापमान हे 24 ते 28 अंशांच्या आसपास राहील.  


कधी, कुठे पाहू शकता सामना?


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी20 सामना (India vs South africa 3rd t20) भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. इंदोरच्या होळकर क्रिकेट मैदानात होणाऱ्या या सामन्याच लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


कशी असू शकते दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया?


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, दीपक चाहर


हे देखील वाचा -