(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hardik Pandya : मर्यादीत षटकांमध्ये हार्दिक भारताचा 'स्टार खेळाडू,' माजी भारतीय क्रिकेटपटूकडून पांड्याचं कौतुक
Hardik Pandya in Team India : भारतीय संघातील स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या आयपीएल 2022 पासून पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतला असून त्याची कामगिरी पाहता त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) टी20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाने (Team india) अप्रतिम प्रदर्शन केलं. ज्यामुळे पहिल्यांदाच भारताने इंग्लंडला त्यांच्याच भूमीत टी20 आणि एकदिवसीय मालिकेत मात दिली. भारताने मिळवलेल्या या यशात संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मोठं योगदान दिलं आहे. ज्यानंतर सर्वच स्तरातून हार्दिकवर कौतुकाचा वर्षाव होत असून आता माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्राने (Aakash Chopra) मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारताचा सर्वात महत्वपूर्ण खेळाडू असल्याचं म्हटलं आहे.
हार्दिक पांड्याला इंग्लंडविरुद्धत्या एकदिवसीय मालिकेत मालिकावीराच्या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलं. अत्यंत निर्णायक सामन्यात हार्दिकने महत्त्वाच्या चार विकेट्स घेतल्या शिवाय 71 धावांची अत्यंत महत्वपूर्ण खेळी देखील तो खेळला. ज्यानंतर त्याचं सर्वांनीच कौतुक केलं. असून आकाश चोप्राही पांड्याचं कौतुक करताना म्हणाला,''पूर्ण फिटनेस परत मिळवल्यानंतर हार्दिक अगदी दमदार फॉर्मात दिसत आहे. तो गोलंदाजीही चांगली करत आहे. आता पांड्यामध्ये एक वेगळ्याच लेव्हलचा खेळाडू दिसत आहे. आयपीएलमध्ये मिळालेल्या जबाबदारीनंतरच हार्दिकमध्ये हा बदल झाला आहे. आता तो केवळ एक फिनिशर राहिला नसून त्याच्यावर संघाची मोठी जबाबदारी आहे. तो सघ्या मर्यादीत षटकांमध्ये भारताचा अत्यंत महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.''
आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पांड्याची कामगिरी
गुजरात टायटन्सच्या संघाचं नेतृत्व करताना हार्दिक पांड्यानं 15 सामन्यात 487 धावा केल्या आहेत. ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीतही हार्दिक पांड्यानं चांगली कामगिरी करून दाखवली. या हंगामात त्यानं आठ विकेट्स घेतले आहेत.
हे देखील वाचा-
- Sreesanth about Virat : 'विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मी खेळलो असतो तर संघाने विश्वचषक जिकला असता,' माजी गोलंदाज श्रीशांतचा दावा
- Zlatan Ibrahimovic: एज डजन्ट मॅटर! वयाच्या 41व्या वर्षानंतरही स्टार खेळाडू ज्लाटान इब्राहिमोविचस खेळणार फुटबॉल
- Commonwealth Games 2022: विश्वचषकात महिला हॉकी संघाचं खराब प्रदर्शन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा