IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्यानं स्वत:चाच विक्रम मोडला!
Hardik Pandya ODI Best: भारताचा अष्टैपलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. आयर्लंडविरुद्ध संघाची जबाबदारी योग्य पद्धतीनं संभाळल्यानंतर इंग्लंड दौऱ्यात तो दमदार प्रदर्शन करत आहे.
![IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्यानं स्वत:चाच विक्रम मोडला! Hardik Pandya Career Best Figures Bowling Performance ODI 7 Overs 3 Maiden 24 Runs 4 Wicket IND vs ENG 3rd ODI IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्यानं स्वत:चाच विक्रम मोडला!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/17/9933a2b44977489a97aed09c0c1934b31658074209_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hardik Pandya ODI Best: भारताचा अष्टैपलू हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) यंदाचं वर्ष चांगलं ठरलंय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात (IPL 2022) गुजरातच्या संघाला विजेतेपद जिंकून दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघात त्यांचं स्थान पक्क करत आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भेदक गोलंदाजी केली. ज्यामुळं इंग्लंडच्या संघ 45.5 षटकात 259 धावांवर ऑलआऊट झाला. भारताकडून हार्दिक पांड्यानं सर्वाधिक चार विकेट्स घेऊन स्वत:चाच विक्रम मोडलाय. या सामन्यात हार्दिकनं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केलीय.
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडला कमी धावसंख्येवर रोखण्यात हार्दिक पांड्यानं महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात हार्दिकनं 7 षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. ही हार्दिकच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. विशेष म्हणजे, या सामन्यात त्यानं तीन निर्धाव षटकही टाकल्या. यापूर्वी हार्दिकनं 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. त्यावेळी त्यानं 31 धावा खर्च करून तीन विकेट्स घेतल्या होत्या.
ट्वीट-
या सामन्यात इंग्लंडच्या डावातील 10 व्या षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर त्यानं जेसन रॉयला बाद करून पहिली विकेट्स घेतली. हार्दिकनं हे षटक निर्धाव टाकलं. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या षटकात त्यानं फक्त दोन धावा दिल्या. तिसऱ्या षटकात बेन स्टोक्सला बाद केलं. या षटकातही त्यानं एकही धावा दिली नाही. हे षटकही निर्धाव ठरलं. यानंतर इंग्लंडच्या डावातील 37व्या षटकात हार्दिकनं लिव्हिंगस्टोन आणि जोस बटलर यांना बाद करून त्यानं इंग्लंडला दुहेरी धक्का दिला.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)