Happy Birthday King Kohli : रेकॉर्ड्सचा बेताज बादशाह विराट कोहली; तिन्ही फॉर्मेटमध्ये जबरदस्त कामगिरी
Happy Birthday King Kohli : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 32वा वाढदिवस. विराटने आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेक विक्रम आपल्या नावावर करत दिग्गजांना मागे टाकलं आहे.
Happy Birthday King Kohli : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या विराट कोहली क्रिकेट विश्वातील रेकॉर्ड्सचा बेताज बादशाह आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण ज्या वेगाने विराटने गेल्या काही वर्षांत रेकॉर्ड्सचा डोंगर उभा केला आहे. ते पाहिलं तर असा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो की, विराट येत्या काळात स्टार फलंदाज म्हणून जवळपास सर्वच रेकॉर्ड्स आपल्या नावे करू शकतो.
विराट कोहलीने आतापर्यंत भारतीय संघासाठी 86 टेस्ट, 248 वनडे आणि 82 ट्वेंटी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. या तिनही फॉर्मेटमध्ये विराट कोहलीच्या आसपास कोणताच दुसरा फलंदाज नाही. सध्या तो एकटाच फलंदाज असा आहे की, ज्याच्या नावावर टेस्ट, वनडे आणि ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये ज्याची फलंदाजी सरासरी 50 पेक्षा अधिक आहे.
विराटच्या टेस्ट रेकॉर्ड्सवर एक नजर
-
- विराट कोहली टेस्ट रँकिंगमध्ये पुन्हा एकदा 937 पॉईंट्सपर्यंत पोहण्यात यशस्वी झाला आहे. कोहली व्यतिरिक्त इतर कोणताही भारतीय खेळाडू टेस्ट रँकिंगमध्ये एवढे पॉईंट्स मिळवू शकलेला नाही.
- विराट कोहली जगभरातील एकमेव असा फलंदाज आहे. ज्याने सलग चार सीरीजमध्ये दुहेरी शतकं फटकावली आहे. डॉन ब्रॅडमॅन आणि राहुल द्रविड यांनी तीन सीरीजमध्ये सलग तीन दुहेरी शतकं फटकावली आहेत.
- कर्णधार म्हणून विराट कोहली टेस्ट क्रिकेटमध्ये 6 दुहेरी शतकं फटकावणारा एकमेव फलंदाज आहे.
- कोहली सर्वात कमी सामन्यामध्ये 25 शतकं फटकावणारा भारतीय खेळाडू आहे.
- कोहली भारतीय खेळाडूंपैकी सर्वाधित 7 दुहेरी शतकं फटकावणारा खेळाडू आहे.
• 2011 World Cup-winner • 21,901 runs, 70 centuries in intl. cricket • Most Test wins as Indian captain • Leading run-getter in T20Is (Men's)
Wishing #TeamIndia captain @imVkohli a very happy birthday. ???????? Let's revisit his Test best of 254* vs South Africa ???????? — BCCI (@BCCI) November 5, 2020
कोहलीचे अद्भूत वनडे रिकॉर्ड्स
- विराट कोहली एकमेव असा भारतीय खेळाडू आहे, ज्याने आयसीसी रँकिंगमध्ये 911 पॉईंट्स मिळवले आहेत.
- विराट कोहलीच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 8,000 (175 डावांत), 9000 (194 डावांत), 10,000 (205 डावांत) आणि 11,000 (222 डावांत) सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे.
- वनडे क्रिकेटमध्ये लक्ष्य गाठण्यासाठी विराट कोहलीने सर्वाधिक 23 शतकं फटकावली आहेत.
- विराट कोहली सर्वात जलद शतकं फटकावणारा भारतीय खेळाडू आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 2013 मध्ये केवळ 52 चेडूंमध्ये 100 धावा पूर्ण केल्या होत्या.
- ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्येही विराट कोहलीने आयसीसी रँकिंगमध्ये सर्वात जास्त 897 पॉईंट मिळवेल आहेत. विराट कोहली आयपीएलच्या 183 डावांत सर्वाधिक 5872 धावा करणारा फलंदाज आहे.