WTC Final : टीम इंडियात पुनरागमनासाठी हनुमा विहारी सज्ज; डब्ल्यूटीसी फायनलबाबत केला मोठा दावा
WTC Final : हनुमा विहारी दुखापतीमुळे इंग्लंड सीरीज दरम्यान, भारतीय संघात सहभागी होऊ शकला नव्हता. विहारीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना जानेवारीत दुखापत झाली होती. दरम्यान, त्यानंतर विहारीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेशसाठी सात सामने खेळले.
मुंबई : देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमियर लीगचा 14वा सीझन रद्द करण्यात आला. त्यामुळे क्रिकेट प्रेमींची निराशा झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु, टीम इंडिया लवकरच मैदानावर वापसी करणार आहे, त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये पुन्हा एकदा उत्साह पाहायला मिळत आहे. टीम इंडिया पुढच्या महिन्यात न्यूझीलंड विरोधात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. अशातच ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन करणारा धडाकेबाज खेळाडू हनुमा विहारीनं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया उत्तम कामगिरी करणार असा विश्वास व्यक्त केला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना साउथम्टपनमध्ये 18 ते 22 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहे. विहारीने म्हटलं की, "अंतिम सामन्यासाठी त्याने सराव केला आहे. विहारी म्हणाला की, "मी डब्ल्यूटीसी फायनल आणि इंग्लंड सीरीजसाठी उत्तम खेळी करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. सर्व भारतीय चाहत्यांसाठी हा सामना अत्यंत रोमांचक असणार आहे. आम्ही न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाविरोधात हा सामना खेळणार आहोत. त्यामुळे तेथील परिस्थिती आव्हानात्मक असणार आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की, टीम इंडिया अनेक अशक्य गोष्टी शक्य करु शकते."
हनुमा विहारी दुखापतीमुळे इंग्लंड सीरीज दरम्यान, भारतीय संघात सहभागी होऊ शकला नव्हता. विहारीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना जानेवारीत दुखापत झाली होती. दरम्यान, त्यानंतर विहारीने विजय हजारे ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेशसाठी सात सामने खेळले.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी विहारीचा कसून सराव
हनुमा विहारी आता पूर्णपणे फिट असून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात मिडिल ऑर्डरमध्ये खेळताना दिसून येऊ शकतो. विहारी म्हणाला की "मला खात्री आहे की, आम्ही डब्ल्यूटीसी फायनलमध्ये उत्तम कामगिरी करुच. मी डब्ल्यूटीसी फायनल आणि इंग्लंड सीरीजसाठी कसून सराव करत आहे."
दरम्यान, हनुमा विहारीने दुखापतग्रस्त होऊनही सिडनी कसोटीत उत्तम फलंदाजी केली आणि सामना ड्रॉ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. विहारीला त्याच्या उत्तम खेळीचं बक्षिसही मिळालं आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी टीम इंडियाच्या संघात त्याची निवड करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :