जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार, करुण नायरला वगळून कुणाला संधी? भारतीय संघात एक बदल होण्याची शक्यता
भारताला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील कसोटीमध्ये भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. भारताला लॉर्डस कसोटीत 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानं संघात बदल होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार,संघात एक बदल?
Continues below advertisement
1/5
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड 2-1 अशी आघाडीवर आहे. लीडस आणि लॉर्डस कसोटी इंग्लंडनं जिंकली तर बर्मिंघम कसोटीत भारतानं विजय मिळवला. चौथी कसोटी 23 जुलैपासून सुरु होईल ती 27 जुलै पर्यंत सुरु राहील. या कसोटीत भारताकडून जसप्रीत बुमराह खेळणार असल्याची माहिती आहे. तर करुण नायरला वगळलं जाऊ शकतं. बुमराहची या दौऱ्यातील ही तिसरी कसोटी असू शकते.
2/5
करुण नायरला 8 वर्षानंतर भारतीय संघात स्थान मिळालं होतं. पहिल्या तीन कसोटीमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं करुण नायरला वगळून त्याच्या जागी साई सुदर्शनला संधी मिळणार असल्याच्या चर्चा आहेत.
3/5
भारताचा संभाव्य संघ : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कॅप्टन), रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाशदीप आणि मोहम्मद सिराज
4/5
इंग्लंडचा संभाव्य संघ : जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेट कीपर), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर आणि शोएब बशीर.
5/5
मँचेस्टरमध्ये 86 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये 32 वेळा पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. 17 वेळा पहिल्यांदा गोलंदाजी करणाऱ्या संघानं विजय मिळवला आहे. चौथ्या कसोटीत पहिल्या डावात जो संघ 350 धावा करेल तो विजयी होऊ शकतो.
Continues below advertisement
Published at : 17 Jul 2025 08:43 PM (IST)