Ravindra Jadeja: बायको भाजपची उमेदवार, बहीण काँग्रेसची स्टार प्रचारक; अन् रवींद्र जाडेजा धर्मसंकटात!
Gujarat Elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पहिली यादी जाहीर केलीय.
Gujarat Elections 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत भाजपनं भारताचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जाडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी रीवाबा जाडेजाला (Rivaba Jadeja) उमेदवारी घोषित केलीय. ज्यानंतर जाडेजाच्या घरात मोठा ट्विस्ट आलाय. भाजपनं रीवाबा यांच्यावर जामनगरमधून निवडणूक लढवण्याची जबाबदारी सोपवली आहे. रीवाबा 2019 पासून भाजपचं काम करतायेत. जामनगरच्या विकासासाठी त्यांच्याकडं अनेक प्लॅन्स आहेत, असाही त्यांनी दावा केलाय.पण, रीवाबा यांच्यासमोर त्यांची सख्ख्यी नणंद नैना जाडेजाचं आव्हान आहे, ज्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत.
रीवाबा यांच्याकडं कामांची यादी आहे. पण ती सर्व कामं तेव्हाच पूर्ण होतील, जेव्हा त्या आमदार होतील. जेव्हा त्या आपल्या नणंदेला प्रचारात मागं टाकतील. नैना जाडेजा या गुजरात महिला काँग्रेसच्या महामंत्री आणि जामनगरच्या स्टार प्रचारक आहेत. जिथं नैना यांच्या वहिनी म्हणजेच रीवाबा जाडेजा भाजपच्या उमेदवार आहेत. तिथंच नैना जाडेजा काँग्रेस उमेदवारासाठी दिवसरात्र प्रचार करतायेत. जामनगरच्या जागेवरुन नणंद-भावजयीचा संघर्ष सुरु झालाय.
जाडेजाचं कुटूंब राजकारणाच्या केंद्रस्थानी
जामनगरमध्ये धर्मेंद्रसिंह जाडेजा यांचाच प्रभाव आहे. 2012 साली त्यांना भाजपनं तिकीट दिलं नाही. त्यानंतर त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि जिंकलीही. दरम्यान, 2017 साली भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आणि ते पुन्हा निवडून आले. यंदा मात्र भाजपनं त्यांचं तिकीट कापलंय आणि काँग्रेसनंही उमेदवारी घोषित केलीय. त्यामुळं रविंद्र जाडेजाचं कुटुंब राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय.
रवींद्र जाडेजा धर्मसंकटात
टीम इंडिया पराभवाच्या छायेत असताना किंवा कठीण परिस्थितीतल्या सामन्यात रविंद्र जाडेजानं कमालीची कामगिरी बजावून अनेकदा भारताला जिंकून दिलंय. अनेकवेळा ही कामगिरी करणाऱ्या जाडेजासमोर आताही अशीच स्थिती आहे. बायकोचा प्रचार करायचा की बहिणीचा? आता या राजकीय गुगलीवर जाडेजा षटकार मारणार की आऊट होणार. हे लवकरच कळेल.
ट्वीट-
Cricketer Ravindrasinh Jadeja's wife Rivaba Jadeja to contest from Jamnagar North constituency.#GujaratAssemblyPolls pic.twitter.com/mbZGPgXJP8
— ANI (@ANI) November 10, 2022
ट्वीट-
I support BJP.@narendramodi #rivabajadeja jai hind 🇮🇳 pic.twitter.com/GXNz5o07yy
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) April 15, 2019
हे देखील वाचा-