एक्स्प्लोर

Guatam Gambhir: टी-20 विश्वचषकादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अन् गौतम गंभीरची भेट; नेमकं कारण काय?

Guatam Gambhir Meet Amit Shah: गौतम गंभीरने 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार म्हणून दिल्ली येथून निवडणूक लढवली होती.

Guatam Gambhir Meet Amit Shah: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या सहकारी पक्षांसोबत मिळून सलग तिसऱ्यांदा सरकार बनवले. एनडीचे सरकार बनल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. गौतम गंभीरने अमित शाह यांना निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर (आधीचे ट्विटर) आपल्या आणि अमित शाह यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.

गौतम गंभीरने 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खासदार म्हणून दिल्ली येथून निवडणूक लढवली होती. गौतम गंभीरने त्यावेळेस आम आदमी पक्षाच्या आतिशी मार्लेना यांना 6,95,109 मतांच्या फरकाने हरवले होते. आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर या माजी क्रिकेटरने 2 मार्च 2024 ला घोषणा करताना सांगितले की तो राजकारणातून बाहेर होत आहे. तसेच पुढे केवळ क्रिकेटच्या प्रकल्पांवर लक्ष देईल.

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकरदासाठी गंभीरचं नाव निश्चित-

कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर लवकरच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनणार आहेत. याबाबत महिन्याच्या शेवटी बीसीसीआयकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. सधा सुरु असलेल्या 2024 च्या टी 20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात येणार आहे. 

गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द -

गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 व-नडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वन-डेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये  4154 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.

संबंधित बातम्या:

Fastest T20 Hundred: 27 चेंडूत झळकावले शतक, 18 षटकार अन् 6 चौकारांचा पाऊस; ख्रिस गेलचा मोडला विक्रम

T20 World Cup 2024 : अखेर सुपर 8 मधील सर्व संघ ठरले, भारताचे सामने कोणत्या दिवशी, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

T20 World Cup 2024: 'गॅरी तिथे वेळ वाया घालवू नको, भारताला प्रशिक्षण देण्यासाठी ये...'; माजी खेळाडूने दिला सल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  13 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde On BMC Election :काहीही करून पालिका जिंकायची, त्यामुळे शांंत बसू नका, शिंदेंचा निर्धारEknath Shinde On BMC Election  : प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार,एकनाथ शिंदेंचा बीएमसीसाठी निर्धारSpecial Report Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा,14 तारखेला मंत्रिमंडळ मिळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Embed widget