(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FIFA WC 2022: गतविजेत्या फ्रान्सनं उपांत्यपूर्व फेरी गाठली, पोलंडचं स्वप्न भंगलं!
FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वचषकाच्या तिसऱ्या प्री क्वार्टर फायनल सामन्यात गतविजेत्या फ्रान्सनं पोलंडचा (France vs Poland) 3-1 नं पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये धडक दिलीय.
FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वचषकाच्या तिसऱ्या प्री क्वार्टर फायनल सामन्यात गतविजेत्या फ्रान्सनं पोलंडचा (France vs Poland) 3-1 नं पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये धडक दिलीय. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात फ्रान्सच्या संघानं नवव्यांदा क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. या पराभवासह पोलंडच्या संघाचा या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. पोलंडच्या संघानं 1982 मध्ये शेवटचा क्वार्टर फायनल (Quarter Finals) सामना खेळला होता.
या सामन्यात फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पेनं दोन गोल केले. यंदाच्या फुटबॉल विश्वचषकातील एम्बाप्पेचा पाचवं गोल आहे. तर, फुटबॉल विश्वचषकातील त्याचं नववा गोल आहे. पोलंडसाठी कर्णधार रॉबर्ट लेवनडॉक्सीनं अखेरच्या क्षणी गोल केला. पहिल्या हाफमध्ये रॉबर्ट लेवनडॉस्कीला गोल करता आला नाही. पण फ्रान्सच्या खेळाडूंमुळे रेफ्रींनी पुन्हा संधी दिली.या संधीचा फायदा घेत रॉबर्ट लेवांडोस्कीने पोलंडसाठी गोल केला.
ट्वीट-
The defending champs march on to the Quarter Finals! 🇫🇷@adidasfootball | #FIFAWorldCup
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 4, 2022
ट्वीट-
Two more Round of 16 matches in the books, we go again tomorrow!#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 4, 2022
किलियन एम्बाप्पेचा जबरदस्त खेळ
ऑलिव्हर गिरूडनं 44व्या मिनिटाला फ्रान्ससाठी पहिला गोल केला.यानंतर किलियन एमबाप्पेनं 74 व्या मिनिटाला फ्रान्ससाठी दुसरा गोल केला. पुन्हा किलियन एमबाप्पेनं गोल करून फान्सच्या संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. क्वार्टर फायनल सामन्यात फ्रान्ससमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे.हा सामना 10 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.
पोलंडची स्टार्टिंग इलेव्हन:
वोचेक सेज्नी (गोलकीपर), मॅटी कॅश, कॅमिल ग्लिक, जेकब किवर, बार्टोझ बेरेझिंस्की, ग्रेगोर्झ क्रिचोविआक, जेकब कामिन्स्की, सेबॅस्टियन सिजमेंस्की, पिओटर जिलिंस्की, प्रझेमिस्लॉ फ्रँकोव्स्की, रॉबर्ट लेवांडोस्की (कर्णधार)
फ्रान्सची स्टार्टिंग इल्वेहन:
ह्यूगो लॉरिस (कर्णधार), ज्युल्स कोंडे, राफेल वराने, डेओट उपमेकानो, थिओ हर्नांडेझ, ऑरेलियन चौमेनी, अॅड्रिएन रॅबिओट, ओस्माने डेम्बेले, अँटोइन ग्रिजमन, किलियन एमबाप्पे, ऑलिव्हियर गिरौड.
हे देखील वाचा-