एक्स्प्लोर
Advertisement
पाकिस्तानची झोप उडवणाऱ्या सामन्यात सरफराजच्या जांभया, सोशल मीडियावर ट्रोल
सामना सुरु असतानाच चक्क सरफराज भर स्टेडियमवरच जांभया देताना दिसला. पाकिस्तानी संघावर तोंडसुख घेताना मागे न पडणारे भारतीय चाहते आणखी तुटून पडले.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की प्रेक्षकांच्या अंगात वेगळाच उत्साह संचारतो. त्यात विश्वचषकातील सामना असेल, तर चाहत्यांना युद्धज्वर चढतो. भारत आणि पाकिस्तानातील चाहते नखं कुरतडत हा सामना पाहत असताना, एक माणूस काहीसा निर्धास्त दिसला. तो म्हणजे खुद्द पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद.
सामना सुरु असतानाच चक्क सरफराज भर स्टेडियमवरच जांभया देताना दिसला. कॅमेराच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. साहजिकच सरफराजचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले. पाकिस्तानी संघावर तोंडसुख घेताना मागे न पडणारे भारतीय चाहते आणखी तुटून पडले.
नाणेफेक जिंकून पाकिस्तानने भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. रोहित आणि राहुलच्या जोडीने दणक्यात सुरुवात करुन दिली. खरं तर भारताची ही सुरुवात पाकची झोप उडवणारी होती. मात्र सरफराजला झोप आल्यामुळे पाकिस्तानी चाहतेही भडकले. कोणी सरफराजला 'स्लीप फील्डर' म्हणून डिवचलं, तर कोणी सरफराजने आशा सोडून दिल्याचं म्हटलं.
भारताने पाकिस्तानसमोर 337 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेले पाकिस्तानी फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या आक्रमणासमोर हतबल दिसले. डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव झाला.
पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. त्यानंतर सामना सुरु झाला त्यावेळी डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानसमोर 40 षटकांत 302 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. म्हणजे अवघ्या 5 षटकांत पाकिस्तानला 136 धावांचं अशक्य आव्हान मिळालं होतं.
सोशल मीडियावरील वायरल मेसेज
Sarfaraz was seen yawning! He is a wicket-keeper + sleep fielder. #INDvPAK
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) June 16, 2019
Sarfaraz's yawn is such a meme-able moment.
— Meshaal Perwaiz Khan (@SojaoSub) June 16, 2019
Sarfaraz looks like the helpless class monitor.
— (S)AINT (@jatin_stevieG) June 16, 2019
Sarfaraz is yawning soch raha hai "Chalo iss match ko jitne ka koi chance nahi"
— D kumar (@dkumar26) June 16, 2019
Sarfaraz was yawning just before this FOUR. It’s quite understandable. Who wants to do fielding after lench, after all! #INDvPAK
— Nishtha Gautam (@TedhiLakeer) June 16, 2019
Unprofessional attitude by Sarfaraz #IndiavPakistan
— Jahangir Ali (@jahangirrrr) June 16, 2019
inshallah.. ab match mein koi interest nahi raha.. kab hotel jaa kar massage karwayenge? pic.twitter.com/tMUm6SecCH
— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) June 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement