एक्स्प्लोर

IND vs ENG : भारताविरुद्ध पराभव, इंग्लंड स्पर्धेबाहेर, माजी कॅप्टनची गुगली, म्हणाला आपल्याकडे 'ती' स्पर्धा जिंकण्याची संधी

IND vs ENG : भारतानं इंग्लंडला पराभूत केल्यानंतर माजी कॅप्टन मायकल वॉन यानं एक पोस्ट केली आहे. इंग्लंड टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडलं आहे.

नवी दिल्ली :  भारतानं (India) इंग्लंडला (England) 68 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्न विकेट गमावल्या. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीपुढं इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली. भारतानं विजय मिळवल्यानंतर इंग्लंडचे माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) यांनी एक खोचक ट्वीट केलं आहे. इंग्लंडकडे आता किमान यूरो कप जिंकण्याची संधी आहे, असं  मायकल वॉन म्हणाले आहेत. 

इंग्लंडचे माजी कॅप्टन मायकल वॉन यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील मॅच संदर्भात त्यांची मतं व्यक्त केली आहेत.  भारताविरुद्ध पराभव झाल्यानं इंग्लंडचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. टी 20  वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत पराभव झाल्यानं त्यांचं आव्हान संपुष्ठात आलं. आपण अजूनही यूरो कप जिंकू शकतो, असं मायकल वॉननं म्हटलं आहे.  यूरो फुटबॉल स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याची संधी आपल्याकडे आहे, असं मायकल वॉननं म्हणत जोस बटलरच्या टीमची फिरकी घेतली आहे. 

इंग्लंडनं ती मॅच जिंकली असती तर

भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपलं. माजी कॅप्टन मायकल वॉन यांनी इंग्लंडच्या टीमच्या कामगिरीवर भाष्य केलं. यामध्ये त्यांनी म्हटलं की जोस बटरच्या टीमनं  दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं असतं तर त्यांना त्रिनिदाद मध्ये सेमी फायनल खेळण्याची संधी मिळाली असती.  इंग्लंडनं तिथं विजय मिळवला असता तर ते अंतिम फेरीच्या लढतीत पोहोचले असते. भारतासाठी गयानाचं ग्राऊंड चांगलं होतं, असं देखील मायकल वॉन म्हणाले. 

 गतविजेत्यांचं आव्हान संपलं

इंग्लंडनं 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता. इंग्लंडनं दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी इंग्लंडचा सुपर 8 मधील प्रवेश ऑस्ट्रेलियानं स्कॉटलंडला पराभूत केल्यानं झाला होता. सुपर 8 मध्ये इंग्लंडनं दमदार कामगिरी  केल्यानं त्यांनी वेस्ट इंडिजला मागं टाकत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. इंग्लंडसमोर यावेळी भारताचं आव्हान होतं. भारतीय संघ 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा  रोहित शर्माच्या टीमनं काढला. इंग्लंडला 103 धावांवर बाद करत भारतानं 68 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता 29 जूनला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता अंतिम फेरीची लढत सुरु होईल.

संबंधित बातम्या :

Rohit Sharma : रोहित शर्माच्या 2022 च्या अश्रूंच्या एका एका थेंबाचा बदला घेतला, भारताची इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहराचा टेंभा मिरवणाऱ्या इंदुरात पिण्याच्या पाण्यात संडास, गटारीचं पाणी मिसळलं; आतापर्यंत 14 मेले, 162 दवाखान्यात, तब्बल 1400 बाधित
Nagpur Municipal Corporation: भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
भाजपविरोधात पतीची बंडखोरी, माजी महापौर असलेल्या पत्नीनं थेट माहेर गाठलं! 'म्हणाल्या, जोपर्यंत माझे पती...'
PMC Election 2026: पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
पुण्यात राजकीय समीकरणं बदलणार? भाजपला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता, पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाराजीनाट्य
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खातं उघडलं; अहिल्यानगरमधून पहिला उमेदवार बिनविरोध
Embed widget