Eng vs Ind 1st Test Day 3 : बुमराहचा पंजा अन् राहुलचा थाट, शेवटच्या सेशनमध्ये टीम इंडियाचा जबरदस्त पलटवार! लीड्स कसोटी रोमांचक मोडवर
India vs England 1st Test Day 3 Stumps : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला लीड्स कसोटी सामना रोमांचक मोडवर आहे

India vs England 1st Test Day 3 Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला लीड्स कसोटी सामना रोमांचक मोडवर आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 465 धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे टीम इंडियाला फक्त 6 धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने 2 विकेट गमावून 90 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे, टीमची आघाडी 96 धावांवर पोहोचली आहे. केएल राहुल 47 धावा काढून नाबाद आहे, तर कर्णधार शुभमन गिलही 6 धावा काढून खेळत आहे. खराब प्रकाशामुळे खेळ सुमारे 25 मिनिटे आधी संपवावा लागला.
ब्रुकने ठोकल्या 99 धावा, भारताला मिळाली थोडीशी आघाडी...
कालच्या 209/3 धावसंख्येनंतर खेळायला आलेल्या इंग्लिश संघाला तिसऱ्या दिवशी ऑली पोपच्या रूपाने धक्का बसला. काल शतक झळकावून नाबाद राहिलेला पोप आज 106 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. यानंतर कर्णधार बेन स्टोक्स (20) देखील चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करू शकला नाही. पण, ब्रुकने 99 धावा केल्या आणि इंग्लंडचा डाव 465 धावांवर संपुष्टात आला. इंग्लिश संघाकडून जेमी स्मिथनेही 40 धावा केल्या.
Stumps on Day 3 in Headingley 🏟️#TeamIndia move to 90/2 in the 2nd innings, lead by 96 runs.
— BCCI (@BCCI) June 22, 2025
KL Rahul (47*) and Captain Shubman Gill (6*) at the crease 🤜🤛
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND pic.twitter.com/JSlTZeG4LR
बुमराहचा पंजा अन्...
इंग्लंडचा डाव उध्वस्त करण्यात बुमराने महत्त्वाची भूमिका बजावली. जॅक क्रॉली (4) ला बाद करून बुमराहने आपले विकेट खाते उघडले. यानंतर, त्याने बेन डकेट (62) ला आऊट केले. त्यानंतर जो रूट (28), ख्रिस वोक्स (38) आणि जोश टंग (11) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने 24.4 षटकांत 83 धावा देत हे 5 विकेट घेतले. त्याच्याशिवाय प्रसिद्ध कृष्णाने 3 विकेट घेतल्या.
राहुलचा थाट! इंग्लंडविरुद्ध 1000 कसोटी धावा केल्या पूर्ण
दुसऱ्या डावात भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या यशस्वी जैस्वालने नाराज केले. तो फक्त 4 धावा करून बाद झाला. त्याचा डाव ब्रायडन कार्सने संपवला. त्याच वेळी, साई सुदर्शनने 30 धावांची खेळी खेळली. पण, यादरम्यान, केएल राहुल 47 धावांवर नाबाद आहे. गिल त्याच्यासोबत क्रीजवर 6 धावांवर नाबाद आहे.
दुसऱ्या डावात राहुलने इंग्लंडविरुद्ध 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या. राहुल आता इंग्लंड संघाविरुद्ध हा आकडा गाठणारा 17 वा भारतीय फलंदाज बनला आहे. यासोबतच, इंग्लंड हा पहिला देश आहे ज्याविरुद्ध राहुलने कसोटीत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. या संघाविरुद्ध त्याची सरासरी 40 च्या आसपास आहे. इंग्लंडनंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 894 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा -





















