ENG vs IND, 1st ODI Live Streaming : आज भारत विरुद्ध इंग्लंड पहिली वन-डे मॅच; कधी, कुठे पाहाल सामना?
India vs England 1st ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून आज पहिला सामना पार पडणार आहे.
![ENG vs IND, 1st ODI Live Streaming : आज भारत विरुद्ध इंग्लंड पहिली वन-डे मॅच; कधी, कुठे पाहाल सामना? ENG vs IND 1st ODI Live Streaming When Where To Watch India vs England T20 Live Telecast Online IST ENG vs IND, 1st ODI Live Streaming : आज भारत विरुद्ध इंग्लंड पहिली वन-डे मॅच; कधी, कुठे पाहाल सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/11/422ddd67371988b5fd548be18d0991091657551660_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs England Live : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना (1st ODI) सामना खेळवला जाणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकत मालिका 2-1 ने जिंकली. ज्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही भारत विजय मिळवण्यासाठी सज्ज झाला असून आजपासून या मालिकेला सुरुवात होत आहे. आजचा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
आज 12 जुलै रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होईल. 5 वाजता नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना इंग्लंडच्या लंडन येथील केनिंग्टन ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून सोनी लिव्ह या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
इंग्लंडविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
हे देखील वाचा-
- ICC : यंदाचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार जॉनी बेअरस्टोला, जो रुटसह डॅरी मिचेलला मात देत मिळवला मान
- PCB : क्रिकेट बोर्डाकडून सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्यामुळे भडकला पाकिस्तानी ऑलराउंडर, म्हणाला...
- India vs Rest of World : भारतीय क्रिकेटपटूंचा सामना जगातील अव्वल दर्जाच्या क्रिकेटर्सशी, स्वांतत्र्यदिनानिमित्त रंगणार खास सामना, सरकारची बीसीसीआयला मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)