Brendon McCullum: इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये खळबळ, ब्रेंडन मॅक्युलमचं प्रशिक्षकपद धोक्यात, रवी शास्त्रीला मिळणार जबाबदारी?, नेमकं काय घडलं?
Eng vs Aus Ashes Series: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या अॅशेस कसोटी मालिका सुरु आहे.

Eng vs Aus Ashes Series: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (Aus vs Eng) यांच्यात सध्या अॅशेस कसोटी मालिका सुरु आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 3-0 अशी आघाडी घेत मालिकाही खिशात घातली आहे. इंग्लंडचा अॅशेस मालिकेत (Ashes Series) पराभव झाल्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या ब्रेंडन मॅक्युलमच्या (Brendon McCullum) राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. तसेच इंग्लंड संघाचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सनेही राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा अवघ्या 11 दिवसांत 3-0 असा दणदणीत पराभव झाल्याने संघाच्या नेतृत्वात बदलाची मागणी जोर धरू लागली आहे. माजी इंग्लंड फिरकी गोलंदाज माँटी पानेसरने इंग्लंडच्या संघाला नवीन मानसिकतेची आवश्यकता आहे. तसेच ब्रेंडन मॅक्युलमच्या जागी रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात यावी, अशी मागणीही माँटी पानेसरने केली आहे. रवी शास्त्री यांचे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे मागील यश उल्लेखनीय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये दोन मालिका जिंकल्या. 2018-19 आणि 2020-21 मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. या अनुभवामुळे, पानेसरसह काही माजी खेळाडू शास्त्री यांना ऑस्ट्रेलियन संघाच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकणारे प्रशिक्षक म्हणून पोहतोय.
ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला लोळवलं- (England vs Australia)
ऑस्ट्रेलियाने पर्थ येथील पहिला कसोटी सामना अवघ्या 2 दिवसांत 8 विकेट्सने जिंकला. तर ब्रिसबेन येथील दुसरा कसोटी सामनाही ऑस्ट्रेलियाने 8 विकेट्सने जिंकला. अॅशेस मालिकेमधील तिसऱ्या कसोटी सामना एडिलेड येथे पार पडला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 82 धावांनी मात करत मालिकाही जिंकली.
WTC च्या Points Table मध्ये उलथापालथ- (WTC Points Table)
2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतचे सर्व सहा सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाची विजयाची गुण टक्केवारी 100 टक्के आहे. तर दक्षिण अफ्रिकेचा संघा 75 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तर पाकिस्तानचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. 2025-27 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत भारत सहाव्या स्थानावर आहे. भारताची गुणांची टक्केवारी फक्त 48.15 आहे. भारतीय संघाने 2025-27 च्या जागतिक कसोटी हंगामाची सुरुवात इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने केली. भारत-इंग्लंड मालिका 2-2अशी बरोबरीत संपली. भारताने बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकल्या, परंतु जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावल्या. याचाच फटका भारताला बसल्याचे दिसून येत आहे.





















