(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ENG: भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात मुंबई इंडियन्स-आरसीबीचे चाहते, पाहा फोटो
Virat Kohli England vs India Birmingham : ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या फटकेबाजीनंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने भेदक मारा केला.
England vs India Birmingham : ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या फटकेबाजीनंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने भेदक मारा केला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 61.1 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने दमदार शतकी खेळी केली. पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवशी लंच ब्रेक पर्यंत भारताने एक गड्याच्या मोबदल्यात 37 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान आयपीएलचे चाहते दिसून आले.
तिसऱ्या दिवशी स्टेडिअममध्ये मुंबई इंडियन्स आणि आरसीबीचे चाहते दिसून आले. पुरुष मुंबईच्या जर्सीमध्ये तर महिला आरसीबीच्या जर्सीमध्ये दिसून आली. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Mumbai Indians and RCB fan at Edgbaston. pic.twitter.com/3o4MoaSYfg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 3, 2022
सामन्यात काय झाले?
प्रथम फलंदाजी करताना भारताने ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी खेळीच्या बळावर 416 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर गोलंदाजीत कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा केला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. 90 धावांच्या आत इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर जॉनी बेअरस्टो, कर्णधार बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडचा संघ 280च्या पुढे पोहचला. जॉनी बेअरस्टोनं दमदार शतकी खेळी केली. त्याने 140 चेंडूत 106 धावांची खेळी केली. त्याशिवाय, जो रुट 31, बेन स्टोक्स 25, सॅम बिलिंग्स 36 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमरहा आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा केली. सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शामीला दोन तर शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली.
दोन्ही संघाची कामगिरी -
भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 2021 मध्ये पाच सामन्याची मालिका झाली होती. या मालिकेतील अखेरचा सामना कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. हा सामना आता होत आहे. या मालिकेत भारतीय संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे. आज बर्मिंघममध्ये अखेरचा रिशेड्यूल सामना होत आहे. दोन चाहते आयपीएलमधील मुंबई आणि आरसीबी संघाची जर्सी परिधान करुन आलेले होते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.