एक्स्प्लोर

FIFA World Cup 2026 : फुटबॉल विश्वाला हादरवणारा सलग दुसरा मृत्यू! आधी 25 वर्षांचा स्टार गेला, आता FIFA विश्वचषकातून हकालपट्टी झालेल्या रेफरीचा अचानक मृत्यू, नेमकं काय घडलं?

Dutch Referee Rob Dieperink Dies : फिफा विश्वचषक 2026 (FIFA World Cup 2026) दरम्यान फुटबॉल जगताला सलग दुसरा मोठा धक्का बसला आहे.

Dutch Referee Rob Dieperink Dies : फिफा विश्वचषक 2026 (FIFA World Cup 2026) दरम्यान फुटबॉल जगताला सलग दुसरा मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा 25 वर्षीय मिडफिल्डर जेडन ॲडम्स (Jayden Adams News) याचे अचानक निधन झाले होते, ज्याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या धक्क्यातून फुटबॉल जगत सावरत नाही तोच, विश्वचषकाच्या VAR टीममधून बाहेर करण्यात आलेले नेदरलँड्सचे रेफरी रॉब डीपरिंक यांचे वयाच्या 38 व्या वर्षी अचानक निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच डीपरिंक यांना संघातून हटवण्यात आले होते. त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते, मात्र नंतर पुराव्याअभावी ही केस बंद करण्यात आली होती. आता त्यांच्या अचानक जाण्याने फुटबॉल विश्वात पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.

कोण होते रॉब डीपरिंक? (Who was Rob Dieperink?)

रॉब डीपरिंक यांना 2026 च्या विश्वचषकात व्हिडिओ असिस्टंट रेफरी (VAR) ची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार होती. मात्र, स्पर्धा सुरू होण्याच्या साधारण एक महिना आधी त्यांना टीममधून काढून टाकण्यात आले. त्यांच्यावर एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला होता. परंतु, नंतर पुरेशा पुराव्यांभावी हे प्रकरण बंद करण्यात आले होते.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

वृत्तानुसार, रॉब डीपरिंक यांचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाले, पण त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. नेदरलँड्स फुटबॉल असोसिएशनने अधिकृत निवेदन जारी करत त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नेदरलँड्स फुटबॉल असोसिएशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "रॉब डीपरिंक यांच्या निधनाच्या बातमीने आम्हाला मोठा धक्का बसला असून आम्ही अत्यंत दुःखी आहोत. रॉब यांच्या रूपाने आम्ही केवळ एक आदरणीय रेफरीच नाही, तर एक दयाळू आणि समर्पित सहकारी गमावला आहे."

फिफाकडून (FIFA) शोक व्यक्त

जागतिक फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफानेही डीपरिंक यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. फिफाने त्यांच्या कुटुंबाप्रती आणि डच फुटबॉल असोसिएशनप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत. फिफाने आपल्या निवेदनात म्हटले की, "संपूर्ण फुटबॉल समुदायाच्या वतीने आम्ही रॉब यांच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि डच फुटबॉल असोसिएशनला आमच्या संवेदना पाठवतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो."

विश्वचषकापूर्वी का करण्यात आले होते बाहेर?

रॉब डीपरिंक हे 2017 पासून नेदरलँड्सच्या एरेडिव्हिझी या सर्वोच्च फुटबॉल लीगमध्ये रेफरी म्हणून कार्यरत होते. त्यांनी युरो 2024 मध्येही VAR अधिकारी म्हणून कामगिरी बजावली होती. बीबीसीच्या वृत्तानुसार, फिफा विश्वचषक 2026 साठी VAR अधिकाऱ्यांच्या यादीत त्यांची निवड झाली होती, पण नंतर त्यांचे नाव वगळण्यात आले. लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाच्या आरोपाखाली त्यांना अटक केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. याच वादामुळे त्यांना विश्वचषकातील आपल्या भूमिकेला मुकावे लागले होते.

हे ही वाचा -

CSK IPL News : MS धोनीच्या चेन्नईत मोठा भूकंप! फ्लेमिंगनंतर 'या' दोन मोठ्या नावांना नारळ मिळणार; पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget