एक्स्प्लोर

CSK IPL News : MS धोनीच्या चेन्नईत मोठा भूकंप! फ्लेमिंगनंतर 'या' दोन मोठ्या नावांना नारळ मिळणार; पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?

Chennai Super Kings IPL Update News : चेन्नई सुपर किंग्स (CSK) फ्रँचायझीमध्ये मोठ्या बदलांची प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

Chennai Super Kings IPL Update News : चेन्नई सुपर किंग्स (CSK) फ्रँचायझीमध्ये मोठ्या बदलांची प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. तब्बल 18 वर्षे संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिल्यानंतर स्टीफन फ्लेमिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जाण्यानंतर आता आणखी काही मोठी नावेही सीएसकेपासून वेगळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स आणि फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एरिक सिमन्सही सोडू शकतो CSK ची साथ

क्रिकबझच्या अहवालानुसार, स्टीफन फ्लेमिंग यांच्या राजीनाम्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सिमन्स हे देखील संघ सोडू शकतात. मात्र, फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांच्या बाबतीत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सीएसके व्यवस्थापनाने फ्लेमिंग यांचा राजीनामा हा परस्पर संमतीने आणि चर्चेनंतर झालेला निर्णय असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या महिनाभरापूर्वीच सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) काशी विश्वनाथन यांनी फ्लेमिंग पुढील हंगामातही संघाचे मुख्य प्रशिक्षक राहतील, असे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर अचानक घडलेल्या घडामोडींमुळे फ्लेमिंग यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे.

फक्त IPL नव्हे, सीएसकेच्या इतर संघांचीही जबाबदारी फ्लेमिंग यांच्याकडे

स्टीफन फ्लेमिंग हे केवळ आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचेच मुख्य प्रशिक्षक नव्हते. अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट (MLC) स्पर्धेतील टेक्सास सुपर किंग्स तसेच दक्षिण आफ्रिकेतील SA20 लीगमधील जोबर्ग सुपर किंग्स या सीएसके फ्रँचायझीच्या संघांचीदेखील जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र, यंदाच्या हंगामात MLC आणि SA20 या दोन्ही स्पर्धांमध्ये सुपर किंग्स फ्रँचायझीच्या संघांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे मानले जात आहे.

फ्लेमिंग यांच्या कार्यपद्धतीवर व्यवस्थापन नाराज?

मिळालेल्या माहितीनुसार, सीएसकेचे वरिष्ठ व्यवस्थापन स्टीफन फ्लेमिंग यांच्या कार्यपद्धतीबाबत पूर्णपणे समाधानी नव्हते. तब्बल 18 वर्षे संघासोबत राहिल्यानंतर आता नव्या विचारांची आणि नव्या नेतृत्वाची गरज असल्याचे व्यवस्थापनाला वाटत होते. त्यातच मागील तीन आयपीएल हंगामांतील संघाची निराशाजनक कामगिरीही या निर्णयामागील मोठे कारण मानली जात आहे. 2024 ते 2026 या तीन हंगामांत सीएसकेला अनुक्रमे पाचवे, दहावे आणि आठवे स्थान मिळाले. सातत्याने खालावत गेलेल्या कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाने मोठ्या बदलांचा मार्ग स्वीकारल्याचे दिसत आहे.

CEO काशी विश्वनाथन यांचे स्पष्टीकरण

सीएसकेचे CEO काशी विश्वनाथन यांनी फ्लेमिंग यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे चर्चा केली आणि परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला. फ्रँचायझी फ्लेमिंग यांच्या योगदानाचा कायम आदर करेल, असेही त्यांनी नमूद केले. फ्लेमिंग यांच्या निर्गमनानंतर आता एरिक सिमन्स आणि माईक हसी यांच्याबाबतही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. आगामी आयपीएल हंगामापूर्वी सीएसके केवळ खेळाडूंमध्येच नव्हे, तर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफमध्येही मोठी फेरबदल करताना दिसू शकते. त्यामुळे पुढील काही दिवसांत चेन्नई सुपर किंग्सकडून आणखी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा -

Shubman Gill on ICC 50-Over Format : आयसीसीच्या नव्या प्लॅनवर कर्णधार शुभमन गिल भडकला; वनडे क्रिकेटच्या भविष्यासाठी ठणकावून दिला मोठा सल्ला, नेमकं काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sher E Punjab T20 League : भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
भारतात आणखी एका टी-20 लीगची एन्ट्री! शुभमन, अभिषेकसह टीम इंडियाचे अनेक स्टार्स पुन्हा मैदानात उतरणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ind vs Aus U19 Series Update : भारतविरुद्धच्या मालिकेसाठी अंडर-19 ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
भारतविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा चक्रावून टाकणारा संघ जाहीर; टीम इंडियाकडून वैभव सूर्यवंशीकडे सगळ्यांचं लक्ष
Team India : गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
गंभीरच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एकाची विकेट; बीसीसीआयचा पुन्हा धडकी भरवणारा निर्णय, नेमकं काय घडतंय?
India vs Pakistan : पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ
पाकिस्तान उद्धवस्त, भारत थेट प्वॉइंट्स टेबलच्या शिखरावर; एका विजयाने मोठी उलथापालथ
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget