मुंबई : मागील दोन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीचा (Corona) सामना करत आहे. मागील काही महिन्यात कोरोना आटोक्यात आला आहे असं वाटत असतानाच आता दक्षिण आफ्रिकेमध्ये (Corona Virus South Africa Variant) आढळलेल्या नव्या व्हेरिएंटने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. त्यात भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) आगामी दौरा आफ्रिकेतच (India tour of South Africa) असल्याने आता या दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


24 नोव्हेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेत सर्वात आधी कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची नोंद जागतिक आरोग्य संघटनेनं केली. त्यानंतर बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्ये  देखील हा नवीन व्हेरिएंट आढळला.  नव्या व्हेरिएंटचा धोका ओळखून बर्‍याच देशांनी आता दक्षिण आफ्रिकेतील प्रवासावर बंदी किंवा निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्येच 17 डिसेंबरपासून भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 सामने खेळणार आहे. ज्यासाठी टीम इंडियाला 8 किंवा 9 डिसेंबरला रवाना व्हावे लागणार आहे. पण आफ्रिकेत ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने उच्छाद मांडल्याने आता हा दौरा रद्द होण्याची दाट शक्यता आहे. तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या दौऱ्याबाबत काय निर्णय घेणार? याकडं सर्वांच लक्ष लागून आहे.


भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा


1991 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पुनरागमनानंतर 30व्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार्‍या भारताचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) संचालक ग्रॅमी स्मिथ यांनी सांगितले. भारताने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.


17 डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू


दोन्ही देशांदरम्यान खेळवली जाणारी ही तीन सामन्यांची कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असेल. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, दुसरी कसोटी 26 ते 30 डिसेंबर दरम्यान होणार आहे. यानंतर मालिकेतील अंतिम आणि तिसरी कसोटी 03 ते 07 जानेवारी 2022 या कालावधीत खेळवली जाईल. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.


एकदिवसीय आणि टी-20 मालिकेचे वेळापत्रक



  • पहिली वनडे - 11 जानेवारी (बोलंड पार्क)

  • दुसरी एकदिवसीय - 14 जानेवारी (केपटाऊन)

  • तिसरी एकदिवसीय - 16 जानेवारी (केपटाऊन)


टी-20 वेळापत्रक



  • पहिली T20 - जानेवारी 19 (केपटाऊन)

  • दुसरी T20 - 21 जानेवारी (केपटाऊन)

  • तिसरा T20 - 23 जानेवारी (बोलंड पार्क)

  • चौथी T20 - 26 जानेवारी (बोलंड पार्क)


हे ही वाचा



(Due to Omicron Variant of corona Virus Indian South Africa tour in Danger)