KL Rahul on IPL: भारताचा सलामीवीर केएल राहुल ( KL Rahul) गेल्या अनेक हंगामापासून पंजाब किंग्जच्या (Panjab Kings) संघाचं कर्णधारपदं संभाळत आहे. मात्र, तो आयएलच्या पंधराव्या हंगामात (IPL 2022) नुकत्याच सामील झालेल्या लखनौच्या संघाचं (Lucknow franchise)  नेतृत्व करणार असल्याची चर्चा सुरू झालीय. केएल राहुलनं आयपीएलमधील लखनौ संघाचं मालक संजीव गोयंका यांच्या प्रस्तावाला होकार दिल्याचं सांगितलं जातंय. केएल राहुलचं पंजाबच्या संघातून बाहेर पडणं एखाद्या मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नसेल.


मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या पुढील हंगामात केएल राहुल लखनौच्या संघाचं नेतृत्व करताना दिसण्याची शक्यता आहे. केएल राहुलनं पंजाबच्या संघाकडून गेल्या हंगामात चांगली कामगिरी करून दाखवली होती. त्यानं 13 सामन्यात 62.60 च्या सरासरीनं 626 धावा केल्या होत्या. यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे. 


आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी मेगा ऑक्शन होणार आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत आयपीएलमधील सर्व संघाला त्यांच्या रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयला देणं आवश्यक आहे. ज्यात एका संघाला फक्त चार खेळाडूं रिटेन ठेवता येणार आहे. 


नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या टी-20 मालिकेत केएल राहुलनं उत्कृष्ट फलंदाजी केली होती. मात्र, दुखापतीमुळं केएल राहुलला कसोटी मालिकेतून वगळण्यात आलं होतं. राहुलचे डाव्या पायाचे स्नायू दुखावल्यामुळं त्याला सरावही करता येत नसल्यानं तो न्यूझीलंडविरोधातील कसोटी मालिका खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं माहिती दिली होती. त्याच्या जागेवर भारताचा फलंदाज सुर्यकुमार यादवला संघात स्थान देण्यात आलंय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-