Fact Check : अक्षर पटेलच्या निवृत्तीची चर्चा, व्हायरल व्हिडिओने धाकधूक वाढवली; फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Axar Patel Retirement Fact Check : अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये भारतीय अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आपल्या क्रिकेटमधील निवृत्तीची घोषणा करत असल्याचं दिसतं.

Axar Patel Retirement Fact Check : एकीकडे आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकून इतिहास रचला, तर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार अक्षर पटेलच्या निवृत्तीची अफवा सोशल मीडियावर जोर धरू लागली. एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये पटेल म्हणतो की त्याने क्रिकेटला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल 2025 नंतर या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये, अक्षर पटेल असे म्हणत आहे की, "क्रिकेटने मला सर्व काही दिलं आहे, पण आता माझा प्रवास इथेच संपतो...".
या व्हिडिओमध्ये अक्षर पटेलने निवृत्तीबद्दल बोलत आहे आणि त्याने म्हटले की, "खूप महत्त्वाची घोषणा करत आहे. हे करणे माझ्यासाठी सोपे नव्हते. क्रिकेटने मला सर्व काही दिले आहे, माझी ओळख आणि तुमचे प्रेम, पण प्रत्येक प्रवासाचा शेवट असतो. कदाचित माझा आणि क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच होता."
View this post on Instagram
सत्य काय आहे?
अक्षर पटेल हा भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. एबीपी माझाने या व्हिडिओची चौकशी केली, तेव्हा असे कळले की अक्षर पटेलने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. कारण हा व्हायरल व्हिडिओ एआयने बनवला आहे. अक्षर पटेलने स्वतः त्याच्या निवृत्तीबद्दल कोणतेही विधान दिले नाही किंवा कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. त्याच वेळी, बीसीसीआयनेही अशा कोणत्याही गोष्टीची पुष्टी केलेली नाही. अक्षर पटेल आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत होता. दिल्ली संघाला पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पटेल सध्या भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार देखील आहे.
पटले भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार...
याशिवाय, अक्षर पटेल अजूनही भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार आहे आणि त्याने संघात महत्त्वाचे योगदान दिले आहे. गेल्या महिन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली होती. कसोटीव्यतिरिक्त, या दोन्ही खेळाडूंनी टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. या दिग्गजांच्या निवृत्तीनंतर अक्षर पटेल संघातील सर्वात विश्वासू खेळाडूंपैकी एक बनला आहे. अशा परिस्थितीत, व्हायरल झालेला व्हिडिओ केवळ अफवा आहे.
हे ही वाचा -





















