एक्स्प्लोर

गार्डनमध्ये फिरण्यास मनाई होती, म्हणून...; युवा खेळाडूंनी रोहित शर्माची घेतली फिरकी, काय म्हणाले?

Dhruv Jurel Rohit Sharma: टीम इंडियाचा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलची पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dhruv Jurel Rohit Sharma: पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताच्या युवा संघाने झिम्बाब्वेविरुद्ध जबरदस्त मुसंडी मारली आणि सलग चार सामने जिंकत मालिकेवर 4-1 असा कब्जा केला. रविवारी झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 42 धावांनी पराभव केला. शिवम दुबे सामनावीर तर वॉशिंग्टन सुंदर मालिकावीर ठरला.

कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात या संघाने दमदार कामगिरी केली. टीम इंडियाची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड झाली तेव्हा शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आलं होतं. याचदरम्यान टीम इंडियाचा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलची पोस्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ध्रुव जुरेलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने रोहित शर्माच्या गार्डनबाबतच्या विधानावरुन फिरकी घेतली आहे. जुरेलसोबत अभिषेक शर्मा, खलील अहमद, रवी बिश्नोई आणि आवेश खान देखील आहेत. हे सर्व खेळाडू विमानतळावर बसलेले दिसून येताय. या फोटोसह गार्डनमध्ये फिरण्यास मनाई होती, म्हणून आम्ही विमानतळावर फिरायला आलो, असं ध्रुव जुरेलने म्हटलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by J U R E L (@dhruvjurel)

नेमकं प्रकरण काय?

अनेकांना रोहित शर्माच्या या विधानाबाबत संदर्भ माहिती नसले. खरंतर इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणमला झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान रोहित युवा खेळाडूंना ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे ओरडला होता. त्यावेळी कोणीही गार्डनमध्ये फिरल्यास, तुमचं खरं नाही, असं रोहित शर्मा म्हणाला होता. रोहितचं हे विधान स्टंप माईकमध्ये कैद झालं होतं. यानंतर या विधानाची खूप चर्चा रंगली होती. 

रोहित-कोहली-जडेजाची निवृत्ती-

भारताला टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या तिघांच्या निर्णयानं चाहत्यांना धक्का बसला होता. रोहित शर्मा सध्या विदेश दौऱ्यावर आहे, या दौऱ्यामध्ये त्याला एकदिवसीय सामने आणि कसोटी सामन्यांमधून निवृत्तीबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. यासंदर्भात उत्तर देताना रोहित शर्मानं त्याचा पुढचा प्लॅन सांगितला आहे.  

संबंधित बातम्या:

अंबानींच्या लग्नात हार्दिक पांड्याची हवा...; अभिनेत्री अनन्यासोबत थिरकला, सर्वांत जास्त चर्चेत असणारा Video

हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? ते बिग बॉस मराठीने रचला विक्रम;  जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? ते बिग बॉस मराठीने रचला विक्रम; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bus Accident : महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसला नेपाळमध्ये अपघात,  16 जणांचा मृत्यूABP Majha Headlines :  3 PM : 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar on CM : मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्यNandurbar  stampede : धडगावमधील स्टेट बँकेत महिलांची चेंगराचेंगरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणाला...
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत कोर्टाचा मोठा निर्णय
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
जळगावचे 14 जण बुडाले, दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? ते बिग बॉस मराठीने रचला विक्रम;  जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? ते बिग बॉस मराठीने रचला विक्रम; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Ankita Lokhande Pregnancy  : लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!
लग्नाच्या तीन वर्षानंतर अंकिता लोखंडेकडे गुड न्यूज? मित्रानेच गुपित सांगितलं, नवराही लाजला!
Video: राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात गिरट्या; डोकं वर करुन पाहिलं, मनसे अध्यक्ष म्हणाले...
Video: राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात गिरट्या; डोकं वर करुन पाहिलं, मनसे अध्यक्ष म्हणाले...
बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
बस नदीत कोसळून महाराष्ट्रातील 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
Raj Thackeray :  बदलापूरसारख्या नराधमांना काय शासन व्हावं, राज ठाकरेंनी एकच शिक्षा सांगितली, म्हणाले, चौरंग करा!
Raj Thackeray : बदलापूरसारख्या नराधमांना काय शासन व्हावं, राज ठाकरेंनी एकच शिक्षा सांगितली, म्हणाले, चौरंग करा!
Embed widget