Dhruv Jurel News : कर्णधार श्रेयस अय्यर नापास! पण, ध्रुव जुरेल ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरशः धू धू धुतले, वेस्ट इंडिज मालिकेत मिळणार संधी?
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 सप्टेंबरपासून लखनौ येथे खेळला जात आहे.

India A vs Australia A in first unofficial Test : भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिला कसोटी सामना 16 सप्टेंबरपासून लखनौ येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली. सॅम कॉन्स्टास आणि जोश फिलिप यांनी ऑस्ट्रेलियाकडून शानदार शतके झळकावून भारतीय गोलंदाजांना त्रास दिला. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या पहिल्या डावातील 532 धावांच्या प्रत्युत्तरात, भारत अ संघाच्या फलंदाजांनी त्यांच्या पहिल्या डावात जोरदार कामगिरी केली. यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने 114 चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह हा टप्पा गाठत शानदार शतक झळकावले. ध्रुव जुरेलने देवदत्त पडिक्कलसह पाचव्या विकेटसाठी आधीच शतकी भागीदारी केली आहे.
जुरेलचं प्रथम श्रेणी कारकिर्दीतील दुसरे शतक
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध शानदार शतक झळकावणारा भारत अ संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. त्याने देवदत्त पडिक्कलसोबत पाचव्या विकेटसाठी मजबूत भागीदारी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया अ संघाच्या पहिल्या डावातील 532 धावांच्या प्रत्युत्तरात भारत अ संघाला जोरदार पुनरागमन करण्यास मदत झाली. पडिक्कलनेही शानदार अर्धशतक झळकावले. लखनौमधील पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली आणि ऑस्ट्रेलिया अ संघाच्या गोलंदाजांना पूर्णपणे धुव्वा उडवला.
In his zone. At his home. Dhruv Jurel, with 'A' very special hundred in Whites! 🇮🇳🔥💯 pic.twitter.com/wYXKhOoKQk
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 18, 2025
भारत अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर नापास
टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणारा श्रेयस अय्यर गेल्या काही काळापासून त्याच्या बॅटने संघर्ष करत आहे. भारत अ संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा संघाला निराश केले. त्याचा डाव फक्त 13 चेंडूत संपला. ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज कोरी रोचिओलीने त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. दुसऱ्या डावात जरा तरी खेळेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण अय्यरने पुन्हा एकदा निराशा केली आणि फक्त 12 धावा करून परतला.
चार फलंदाजांची धमाकेदार खेळी
ऑस्ट्रेलिया-एविरुद्ध नारायण जगदीशनने 113 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार ठोकत 64 धावांची दमदार खेळी केली. सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन 44 धावा करून बाद झाला, पण टीमला भन्नाट सुरुवात देऊन गेला. साई सुदर्शनने 124 चेंडूत 10 चौकारांसह 73 धावा ठोकल्या. त्याशिवाय बातमी लिहीपर्यंत भारताचा स्कोअर 4 बाद 403 इतका झालेला होता. देवदत्त पडिक्कल तर शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
ऑस्ट्रेलिया-ए च्या फलंदाजांनी इंडिया-ए च्या गोलंदाजांची केली धुलाई
त्याआधी ऑस्ट्रेलिया-एच्या फलंदाजांनी इंडिया-एच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्यांनी पहिल्या डावात 6 बाद 532 वर डाव घोषित केला. त्यात दोन फलंदाजांनी शतकं ठोकून भारतीय गोलंदाजीचा समाचार घेतला.
हे ही वाचा -





















