एक्स्प्लोर

IND vs SL 2nd TEST Devdutt Padikkal : श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...

Devdutt Padikkal Century Ind vs Sl 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील सलग दुसऱ्या कसोटीत देवदत्त पडिक्कलने पुन्हा एकदा शतक ठोकत आपली ताकद दाखवून दिली आहे.

Devdutt Padikkal Century Ind vs Sl 2nd Test : भारताचा युवा स्टार देवदत्त पडिक्कल सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील सलग दुसऱ्या कसोटीत त्याने पुन्हा एकदा शतक ठोकत आपली ताकद दाखवून दिली आहे. कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पडिक्कलने 168 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. विशेष म्हणजे, गॉल कसोटीच्या पहिल्या डावात पडिक्कलने तब्बल 167 धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 44 धावा केल्या. आता कोलंबोमध्येही शतक ठोकत त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची पुन्हा एकदा परीक्षा घेतली आहे.

पहिले दोन जीवदान... मग श्रीलंकेवर घणाघात! (IND vs SL 2nd TEST Devdutt Padikkal)

कोलंबो कसोटीच्या सुरुवातीलाच पडिक्कलला दोनदा जीवदान मिळाले. तो शून्य धावांवर असताना आणि त्यानंतर एक धावांवर असताना त्याचे झेल सुटले. श्रीलंकेला मिळालेल्या या दोन संधींचा पडिक्कलने पुरेपूर फायदा उठवला आणि आता तो यजमान संघासाठी डोकेदुखी ठरला आहे. पडिक्कलने रवींद्र जडेजासोबतही अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव मजबूत केला. सलग दोन कसोटींमध्ये दमदार फलंदाजी करत त्याने तिसऱ्या क्रमांकावरील आपला दावा आणखी भक्कम केला आहे.

देवदत्त पडिक्कल शतक ठोकताच आऊट (Devdutt Padikkal Century Ind vs Sl 2nd Test)

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात दमदार सुरुवात केली आहे. कोलंबोमध्ये सुरू असलेल्या सामन्यात भारताने 76.2 षटकांत 4 बाद 281 धावा केल्या आहेत. देवदत्त पडिक्कलने शानदार शतक ठोकले, पण तब्बल 193 चेंडूंचा सामना करत 12 चौकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी केली आणि आऊट झाला. त्याआधी कर्णधार शुभमन गिलनेही संयमी अर्धशतक झळकावलं. गिलने 50 धावा केल्या. मात्र त्याला असिथा फर्नांडोने निओशन डिकवेल्लाच्या हातून झेलबाद केलं. भारताच्या डावाची सुरुवात करणारा यशस्वी जैस्वाल 45 धावा करून बाद झाला. असिथा फर्नांडोने त्याला बाद केलं. केएल राहुलला मात्र मोठी खेळी करता आली नाही. तो 18 धावांवर लाहिरू कुमारा याचा बळी ठरला.

हे ही वाचा - 

Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20I : भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द होणार? बंगळूरुमध्ये मोठं संकट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
IND vs WI 5th T20I Playing-11 : वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
वैभव सूर्यवंशी, कुलदीप यादव IN; भुवनेश्वर कुमारची अनपेक्षित एन्ट्री? वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात अशी असणार टीम इंडियाची Playing-11
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
Vaibhav Sooryavanshi : रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
रील बनवण्याच्या नादात... वैभव सूर्यवंशी भडकला, विमानतळावर अचानक काय घडलं?, पाहा Video
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
गल्ली ते दिल्ली ज्ञानेशकुमारांविरोधात घेराबंदी झाली असतानाच मोदी सरकार पुन्हा नवीन डाव टाकण्याच्या तयारीत!
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
'तुळजाभवानी संस्थान राणा पाटलांची जहागिरी आहे का?' अंबादास दानवेंनी डिवचताच राणा पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले..
Malegaon Dongrale Case Verdict: मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
मोठी बातमी : मालेगावच्या नराधमाला फाशीची शिक्षा, विजय खैरनारचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ, डोंगराळेच्या चिमुकलीला न्याय!
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानचा वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
Embed widget