Devdutt Padikkal Century : टीम इंडियाने ज्याला बाहेर फेकलं, त्यानेच घातला धुमाकूळ; ठोकले तुफानी शतक, BCCI दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत देणार संधी?
Ind vs Sa T20 Series : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये आरसीबीचा स्टार आणि तडाखेबाज फलंदाज देवदत्त पडिक्कलने धुमाकूळ घातला.

Devdutt Padikkal Century : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये कर्नाटक आणि तमिळनाडू यांच्यात आज 2 डिसेंबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीचा स्टार आणि तडाखेबाज फलंदाज देवदत्त पडिक्कलने धुमाकूळ घातला. कर्नाटककडून खेळताना पडिक्कलने तमिळनाडूविरुद्ध केवळ 46 चेंडूत शतकी खेळी खेळली. तब्बल 221.74 स्ट्राइक रेटने धडाकेबाज फलंदाजी करत त्याने नाबाद 102 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत 10 चौकार आणि 6 गगनचुंबी षटकार मारले. कर्नाटकने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 3 गडी गमावून 245 धावांचा डोंगर उभारला.
टीम इंडियामध्ये अजून मिळालेला नाही संधी
25 वर्षीय देवदत्त पडिक्कलने भारतासाठी 2021 मध्ये टी20 तर 2024 मध्ये कसोटीत पदार्पण केले. दोन्ही फॉर्मेटमध्ये त्याने 2-2 सामने खेळले आहेत. मात्र वनडेत त्याला अजूनही डेब्यू करण्याची संधी मिळालेली नाही. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत तो भारताच्या स्क्वाडमध्ये होता, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. आता त्याने SMAT 2025 मधील या तुफानी खेळीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
🚨 DEVDUTT PADDIKAL SMASHED HUNDRED FROM JUST 45 BALLS IN SYED MUSHTAQ ALI 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) December 2, 2025
- The Star Boy of Karnataka & RCB, 102* from just 46 balls including 10 fours & 6 sixes against Tamil Nadu. 🔥 pic.twitter.com/7XnnntLEu2
BCCI दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत देणार संधी?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होत आहे. सध्याच्या घडीला BCCI ने अजूनही टीम इंडियाच्या अंतिम संघाची घोषणा केलेली नाही. दरम्यान, देवदत्त पडिक्कलने तडाखेबाज शतक ठोकत सिलेक्टरांचे लक्ष वेधून घेतले आहे. आगामी टी-20 विश्वचषक लक्षात घेता भारताला बेंच स्ट्रेंथ मजबूत करायची आहे. अशावेळी पडिक्कलसारख्या फॉर्मात असलेल्या खेळाडूची निवड आश्चर्यकारक ठरणार नाही. आता BCCI संघ जाहीर करताना तरुण पडिक्कलवर विश्वास टाकते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आरसीबीने ऑक्शनपूर्वी केलं रिटेन
16 डिसेंबरला होणाऱ्या आयपीएल 2026 मिनी ऑक्शनपूर्वी सर्व टीमांनी आपली रिटेन लिस्ट जाहीर केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं देवदत्त पडिक्कलला कायम ठेवत त्याच्यावरचा विश्वास दाखवला आहे. देवदत्त पडिक्कल 2020 पासून आयपीएल खेळत आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या 74 सामन्यांत त्याने 126.3 स्ट्राइक रेटने 1806 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर आयपीएलमध्ये एक शतक आणि 11 अर्धशतकं नोंद आहेत.
102* off 46 balls for Devdutt Padikkal against Tamil Nadu in #SMAT2025 🔥
— Cricbuzz (@cricbuzz) December 2, 2025
He smashed 10 fours and 6 sixes as Karnataka scored 245/3 in 20 overs 🤯#IndianCricket #CricketTwitter pic.twitter.com/XjslVWjDYN
हे ही वाचा -





















