Sourav Ganguly On India Women's Cricket Team: कॉमनवेल्थ क्रिकेट स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. ज्यामुळं भारतीय संघाला रौप्यपदकावर सामाधान मानावं लागलंय. ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात भारतासमोर 162 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ 152 धावांवर ढेपाळला. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) भारतीय क्रिकेट महिलांसाठी एक ट्वीट केलंय. ज्यात त्यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदक जिंकलेल्या महिला संघाचं कौतूक केलं. तसेच त्यांचे कानही पिळले आहेत.
सौरव गांगुली काय म्हणाले?
"कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय क्रिकेट महिलांनी रौप्यपदक जिंकलं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. परंतु, ते निराश होऊन मायदेशात परतणार आहेत. कारण हा सामना पूर्णपणे त्यांचा होता."
हरमनप्रीत कौरची एकाकी झुंज
ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 162 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवात खराब झाली. भारतानं 2.4 षटकात 22 धावांवर स्मृती मानधना आणि शेफाली वर्माच्या रुपात दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिना रॉड्रिगुएजनं भारताचा स्कोर 118 धावांवर पोहचवला. परंतु, मेगन शूटच्या गोलंदाजीवर जेमिमा बाद झाली.
ऑस्ट्रेलियाचं जोरदार कमबॅक
त्यानंतर सलग विकेट्स गमावणं सुरुच ठेवलं. दबावाखाली अनावश्यक शॉट खेळून हरमनप्रीत कौरही बाद झाली. या सामन्यात भारतीय महिला संघानं गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं. परंतु शेवटच्या षटकात फलंदाजांनी निशाजनक कामगिरी केली. या सामन्यात भारतीय संघ दबावाखाली खेळताना दिसला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ सामन्यात पिछाडीवर असूनही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी झुंज दिली. याचं यशही त्यांना मिळालं. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं सुवर्णपदकावर नाव कोरलंय.
हे देखील वाचा-
- Achievements@75 : भारत आणि ऑलिम्पिक, स्वांतत्र्यापूर्वीपासून ऑलिम्पिक खेळणाऱ्या भारताचा इतिहास आहे तरी कसा?
- Commonwealth Games 2022 : भारताच्या खात्यात आतापर्यंत 55 पदकं; कोणत्या खेळाडूनं कोणतं पदक जिंकलं? पाहा संपूर्ण यादी
- India Wins Gold In CWG 2022: टेबल टेनिसमध्ये भारताची अप्रतिम कामगिरी! शरथ कमल, श्रीजा अकुला जोडीने पटकावले 'गोल्ड'