India Wins Gold: 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा (Commonwealth games 2022) स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी सुरूच आहे. टेबल टेनिस मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या शरथ कमल (Sharath Kamal) आणि श्रीजा अकुला (Sreeja Akula) या तेजस्वी जोडीने इतिहास रचून सुवर्णपदकावर कब्जा केला. आज झालेल्या अंतिम फेरीत त्याने मलेशियाच्या जावेन चुन आणि केरेन लाइनचा 4-1 असा पराभव केला. या विजयासह दोन्ही भारतीय जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे.
असा रंगला सामना!
टेबल टेनिसमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळाले आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी जेवेन चुंग आणि कॅरेन लीन या मलेशियाच्या जोडीचा 11-4, 9-11, 11-5, 11-6 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्याने हा सामना 4-1 ने जिंकला. अंतिम सामन्यात भारतीय जोडीने चार गेम जिंकले, तर मलेशियाच्या जोडीने केवळ एक गेम जिंकला.
किदाम्बी श्रीकांतने बॅडमिंटनमध्ये जिंकले कांस्यपदक
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमक कायम आहे. आता भारतीय बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतने कांस्यपदक पटकावले आहे. कांस्यपदकाच्या लढतीत त्याने सिंगापूरच्या जिया हेंग तेहचा 21-15, 21-18 असा सलग गेममध्ये पराभव केला. यासह 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या 51 वर गेली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू किदाम्बी श्रीकांत पायाच्या दुखापतीशी झुंज देत होता, परंतु त्याने ही दुखापत आड येऊ दिली नाही.
स्क्वॉश मिश्र दुहेरी स्पर्धेत मिळवले कांस्यपदक
कॉमनवेल्थ स्क्वॉश मिश्र दुहेरी स्पर्धेतील कांस्यपदकाच्या सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. कांस्यपदकाच्या लढतीत दीपिका पल्लीकल (Deepika Pallikal) आणि सौरव घोषाल (Sourav Ghosal) या जोडीनं लॉबन डोना आणि पायली कॅमेरॉन या ऑस्ट्रेलियन जोडीचा 2-0 असा पराभव केलाय. पल्लीकल आणि सौरव यांनी पहिला सेट 11-8 आणि दुसरा सेट 11-4 अशा फरकानं जिंकलाय. 2018 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत दीपिका आणि सौरवनं रौप्य पदक जिंकलं होतं. मात्र, यावेळी या जोडीला काही खास कामगिरी करता आली नाही. उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागलेल्या या जोडीनं कांस्यपदकाच्या लढतीत दमदार कामगिरी केली. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत 50 पदकं जिंकली आहेत.
हे देखील वाचा-
- CWG 2022: निकहत जरीनची 'सुवर्ण' कामगिरी, दिवसभरातील तिसरं सुवर्णपदक, भारताची पदकसंख्या 48 वर
- FIDE Deputy President: विश्वनाथन आनंद यांची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड
- Amit Panghal,CWG 2022: अमित पंघालची सुवर्णपदकावर झडप, भारताची पदकसंख्या 43 वर