India vs West Indies : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील पाचवा टी20 सामना भारताने 88 धावांनी जिंकत मालिकाही 4-1 ने जिंकली आहे. सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने 189 धावाचं लक्ष्य वेस्ट इंडीजला दिलं, जे पार करताना वेस्ट इंडीज 100 धावांच सर्वबाद झाले आणि भारत जिंकला. विशेष म्हणजे भारताकडून 10 च्या 10 गडी हे फिरकीपटूंनी बाद केले. यावेळी सर्वाधिक विकेट्से युवा रवी बिश्नोईने तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. भारताच्या फलंदाजीत श्रेयसचं अर्धशतक आणि पांड्याची तुफानी खेळी महत्त्वाची ठरली.
सामन्यात सर्वप्रथम भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिग्गज खेळाडू विश्रांतीवर असल्याने आज कर्णधार म्हणूनही रोहितच्या जागी हार्दीकला संधी मिळाली. विशेष म्हणजे अनुभवी कुलदीप यादवही संघात परतला होता. अशामध्ये प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताने ईशानची विकेट लगेच गमावली. त्यानंतर मात्र श्रेयस अय्यरने टिकून खेळत अप्रतिम अर्धशतक लगावलं. अय्यरने 64 धावा केल्या असताना दीपक हुडाने त्याला 38 धावांची मदत केली. अखेरच्या ओव्हर्समध्ये कर्णधार पांड्याने 28 धावांची तुफान खेळी खेळत भारताची धावसंख्या 188 पर्यंत नेली.
189 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडीजची सुरुवातच खराब झाली. धाव होण्याआधीपासून त्यांचे विकेट्स जाण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना 189 हे लक्ष्य गाठता आले नाही. 100 धावांवर सर्व संघ बाद झाला.पण शिमरॉन हेटमायरने 56 धावांची दिलेली एकहाती झुंज पाहण्याजोगी होती. भारताकडून 10 च्या 10 गडी हे फिरकीपटूंनी बाद केले. यावेळी सर्वाधिक विकेट्से युवा रवी बिश्नोईने तर कुलदीप यादव आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.