एक्स्प्लोर

Chahal : धनश्री-युजवेंद्रचा घटस्फोट?, एएनआयचं ट्वीट? व्हायरल अफवेवर ANI चं ट्वीटरवरुन स्पष्टीकरण

भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्रीनं पंजाब कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केल्याचे काही ट्वीट एएनआय वृत्तसंस्थेच्या नावाने बनावट अकाऊंटवरुव व्हायरल होत असल्याचं समोर आलं आहे.

Dhanashree and Yuzvendra Chahal  : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री चहल (Dhanashree Chahal) यांच्यात काही तरी खटकलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं असताना आता एका फेक न्यूजने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट तयार करुन त्यावरुन धनश्री आणि युजवेंद्र यांनी पंजाब कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केल्याचे काही ट्वीट व्हायरल होत आहेत. यावर एएनआयने अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ट्वीट करत हे वृत्त खोटं असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्रीबद्दल अशाप्रकारची अफवा व्हायरल होण्यामागेही काही कारणं आहेत. धनश्री आणि युजवेंद्रच्या खाजगी आयुष्यात काही तर खटकलंय अशा चर्चांना उधाण आलं असून धनश्री चहलने तिच्या इन्स्टाग्रामवरुन 'चहल' हे  आडनाव हटवल्यामुळे या चर्चा होत आहेत.  तर धनश्री आणि युजवेंद्र ही जोडी सोशल मीडियावर बरीच प्रसिद्ध आहे. आयपीएल असो किंवा भारताची कोणती टूर धनश्री युजवेंद्र असणाऱ्या सामन्यांना हमखास हजेरी लावते आणि दोघांच्या अनेक सोशल मीडियाव पोस्ट व्हायरल होतात. धनश्री इतर भारतीय क्रिकेटर्ससोबतही मजेशीर तसेच डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते. पण आता काही दिवसांपूर्वीच धनश्रीने इन्स्टाग्रामवरुन चहल हे आडनाव काढत वर्मा हे तिचं माहेरकडचं आडनाव ठेवलं आहे. त्याच दरम्यान युजवेंद्र याने देखील एक स्टोरी शेअर करत नवं आयुष्य लोडिंग (New Life Loading) अशी स्टोरी ठेवली होती. त्यामुळे दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलं असावं अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.

भारताचा स्टार फिरकीपटू

युजवेंद्र चहलने आतापर्यंत 246 टी20 सामन्यात 280 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचा विचार करता चहलने भारतासाठी 58 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 74 विकेट्स घेतल्या असून आयपीएलमध्ये 131 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत. तर स्थानिक टी20 क्रिकेटमध्येही त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्यांनी 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीने आणि 7.75 च्या इकॉनॉमीने 27 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. आता या कमाल फॉर्ममुळे चहल आगामी आयसीसी टी20 विश्वचषकातही (ICC T20 WorldCup) सिलेक्ट होऊ शकतो.

चहल विश्वचषकासाठी सज्ज

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ऑरेंज कॅपवर कब्जा करणारा युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चमक दाखवत आहे. त्याच्या गोलंदाजीसमोर विरुद्ध संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत.  इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतही त्यानं जबरदस्त प्रदर्शन करून दाखवलं आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 47 धावा खर्च करून इंग्लंडच्या चार महत्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं. चहलच्या कामगिरीवर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगनं (Brad Hogg) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषकात युजवेंद्र चहल भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकतो, असं ब्रॅड हॉगचं मत आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Embed widget