क्रिकेटर करुण नायर क्लिन बोल्ड; गर्लफ्रेंड शनायासोबत विवाहबद्ध
भारतीय संघाचा खेळाडू करुण नायरने आपली लग्नगाठ बांधली असून गर्लफ्रेंज शनाया सोबत त्याने विवाह केला आहे.
![क्रिकेटर करुण नायर क्लिन बोल्ड; गर्लफ्रेंड शनायासोबत विवाहबद्ध Cricketer karun nair marriage with girlfriend shanaya tankariwal क्रिकेटर करुण नायर क्लिन बोल्ड; गर्लफ्रेंड शनायासोबत विवाहबद्ध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/20135848/karun.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर करुण नायरने आपली गर्लफ्रेंड शनाया टंकरीवाला सोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. करुण आणि शनायाचा लग्नसोहळा उदयपूरमध्ये पार पडला. लग्नाचे काही फोटो शेअर करत या दोघांनी स्वतः आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली. करुणने आपल्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्या फोटोंवर लाईक्ससोबतच शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, करुण नायर आणि शनाया टंकरीवाला यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये साखरपुडा केला होता. दोघेही एकमेकांना बरेच दिवसांपासून जेट करत होते. वर्षाभरापूर्वी करुणने शनायाला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. दोघांनी आपल्या रिलेशनशिपबाबत आपल्या कुटुंबियांनाही सांगितलं होतं. तसेच त्यांच्या लग्नासोहळ्यासाठी काही नातेवाईक आणि त्यांचे मित्रमंडळी उपस्थित होते.
लग्नानंतर भारतीय संघाच्या क्रिकेटर्सनी करुण आणि शनायाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वेगवान गोलंदाज वरुण एरोनने करुण आणि शनायाचे फोटो शेअर केले आहेत. 'टू ए लाईफटाइम लव्ह अॅन्ड हॅप्पीनेस.' हा फोटो इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on InstagramAnother year older, but not wiser. Happy birthday to my amazing fiancé ❤️
दरम्यान, 28 वर्षीय फलंदाज करुण नायरने डिसेंबर 2016मध्ये कर्नाटकसाठी कसोटी सामन्यांमध्ये भाग घेतला होता. त्याने इंग्लंड विरूद्ध 303 धावा केल्या होत्या. दरम्यान, करुणने भारतासाठी जास्त कसोटी सामने खेळले नाहीत. 2017मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये करुण नायर खेळला होता. तसेच भारताचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासाठीही 2020 ची सुरुवात अतिशय खास ठरली. पांड्याने सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोविकसोबत साखरपुडा केला. हार्दिक आणि नताशाच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान शेअर झाले होते. या जोडप्याने आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवर साखरपुड्याचे फोटो चाहत्यांसाठी शेअर केले. साखरपुड्यानंतर पांड्या कुटुंबाने दोघांचं अभिनंदन केलं. पण त्यांच्या साखरपुड्याबाबत हार्दिकच्या कुटुंबीयांना कोणतीही कल्पना नव्हती.
संबंधित बातम्या :
VIDEO : विराट कोहलीची अफलातून ‘सुपरमॅन कॅच’; पाहून तुम्हीही व्हाल फॅन
हार्दिक पंड्याला क्लिन बोल्ड करणारी 'नताशा' आहे तरी कोण?
हार्दिक-नताशाच्या साखरपुड्याच्या बातमीने धक्का बसला : हार्दिकचे वडील
भारतीय गोलंदाज राहुल चहरचा साखरपुडा; गुलाब देवून गर्लफ्रेंडला प्रपोज
गीता फोगाटच्या घरी आला गोंडस पाहुणा, चिमुकल्याचे फोटो पाहून तुम्हीही व्हाल खूश!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)