Irfan Pathan and Amit Mishra Tweet : इरफान पठाणच्या आणि अमित मिश्राची ट्वीटर वॉर सुरुच; इरफानने शेअर केली संविधानाची प्रस्तावना
इरफान पठाणने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो सध्या विविध क्रिकेट संबधित शोजमध्ये प्रचंड सक्रिय असून तो अनेकदा त्याच्या ट्वीट्समुळेही चर्चेत येतो. आता त्याचं आणि अमित मिश्रांचं ट्वीटरवर कोल्डवॉर सुरु आहे.

Irfan and Amit : क्रिकेटच्या मैदानातून (Cricket) निवृत्त झालेले दोन भारतीय खेळाडू सध्या ट्वीटरवर एकमेंकाविरुद्ध ट्वीटरवर फटकेबाजी करत आहेत. हे खेळाडू म्हणजे इरफान पठाण (Irfan Pathan) आणि अमित मिश्रा (Amit Mishra). नुकतच इरफानने भारताच्या संविधानाची प्रस्तावना शेअर करत मी कायम याचे पालन करतो आणि प्रत्येक नागरिकांनी करावं अशी विनंती केली आहे. दरम्यान या ट्वीटमागे एक पार्श्वभूमी असून अमित मिश्राच्या एका ट्वीटला हे उत्तर आहे.
इरफानने दोन दिवसांआधी पहाटेच्या सुमारास एक देशाबद्दलचं ट्वीट केलं. त्याने यावेळी लिहिलं की, 'माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील सर्वात महान देश होण्याची क्षमता ठेवतो. पण……' इरफानच्या या ट्वीटमधून त्याने देशातील एकंदरीत परिस्थितीबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. इरफानच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी आपआपली मतं दिली. अमित मिश्रानेही यावर त्याची प्रतिक्रिया देत या प्रश्नार्थक ट्वीटचं जणू उत्तर दिलं. त्याने लिहिलं की, 'माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील सर्वात महान देश होण्याची क्षमता आहे... हे तेव्हाच होईल जेव्हा देशातील प्रत्येकाला आपलं संविधान महत्त्वाचं असून त्याचं पालन केलं जाणं अधिक महत्त्वाचं आहे.' दरम्यान या दोघांच्या या ट्वीट्सवर इतरही नेटकरी रिप्लाय देत होते.
इरफान आणि अमितचे आधीचे ट्वीट्स
आता इरफानने संविधानाची प्रस्तावना शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे. 'मी नेहमी याचे पालन केले आहे. मी आपल्या सुंदर देशाच्या प्रत्येक नागरिकाला याचे पालन करण्याची विनंती करतो. कृपया वाचा आणि पुन्हा वाचा.' असं इरफानने लिहिलं आहे. त्याच्या या ट्वीटला नेटकरी भरघोस प्रतिसाद देत असून आता अमित मिश्रा काय रिप्लाय देतो का? हे पाहावे लागेल.
हे देखील वाचा-




















