128 वर्षांनतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणार? विराट कोहलीच्या फोटोचा वापर
Cricket in Olympics : ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे.
Cricket in Olympics : ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. तब्बल 128 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. 1900 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. आता त्यानंतर 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. क्रिकेटशिवाय बेसबॉल-सॉफ्टबॉल, क्रिकेट प्लॅग फुटबॉल, स्कैश आणि lacrosse या खेळांचाही ऑलिम्पिक मध्ये समावेश होणार आहे. दरम्यान, लॉस एंजेलिस 2028 ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव केल्यानंतर ऑलिम्पिक क्रीडा अधिकाऱ्याने व्हिडिओमध्ये विराट कोहलीचा फोटो वापरला. याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
चीनमध्ये नुकत्याच आयोजित हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर आता 2028 सालच्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या यजमान समितीच्या निर्णयाची घोषणा रविवारी मुंबईत होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकांचं सत्र १२ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत होत आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात याआधी 1900 साली क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्या ऑलिम्पिकमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स संघांमध्ये क्रिकेटचा एकमेव सामना खेळवण्यात आला होता. तो जिंकून इंग्लंडनं क्रिकेटचं सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकच्या यजमान समितीकडून ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटची शिफारस करण्यात आली असल्याचं समजतं.
क्रिकेटसह पाच खेळांच्या समावेशासंदर्भात आयओसीच्या ऑलिम्पिक आयोग आयओसीच्या (Olympic Programme Commission ) कार्यकारी मंडळाकडे तशी शिफारस करण्यात येईल. ही शिफासर स्विकारली गेल्यास आयओसीचे कार्यकारी मंडळ मुंबईत होणाऱ्या आयओसीच्या परिषदेत तसा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये 15 ते 17 ऑक्टोबर यादरम्यान आयओसीची परिषद होणार आहे.
Virat Kohli's picture was used by the Olympics handle in their proposed sports list for the 2028 Los Angeles Olympics. pic.twitter.com/fbYGRE1EOb
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 9, 2023
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये, पुरुष आणि महिलां संघाचे सामने टी-20 स्वरूपात आयोजित केले जातील. आशियातील व्यापारी बाजारपेठ हेही यामागी मोठे कारण आहे. भारतासह आशियाई देशात क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे आणि सध्या आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. ब्रिटिश वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटलेय की, लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा प्रवेश निश्चित असल्याचे जुलैमध्येच सांगितले होते. याचे कारण म्हणजे ऑलिम्पिक समिती भारताची मोठी लोकसंख्या आणि आर्थिक संसाधनांकडे दुर्लक्ष करण्याच्या स्थितीत नाही. मात्र, लॉस एंजेलिस समिती आणि आयओसी यांच्यातील वाटाघाटीमध्ये अनेक अडचणी आल्या. आता याबाबतचा लवकरच निर्णय होऊ शकतो.
Olympic Games official has used Virat Kohli's picture in the video after cricket was proposed as one the games in Los Angeles 2028.
— Johns. (@CricCrazyJohns) October 9, 2023
- Kohli is the Face of World Cricket.pic.twitter.com/R5zvn1NnVb