Chess World Cup 2023 Final : प्रज्ञानानंदने कार्लसनला झुंजवलं, दुसरा डावही बरोबरीत, विजेता गुरुवारी ठरणार!
FIDE World Cup Chess Tournament : प्रज्ञानानंद याने फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा घामटा काढला आहे.
बाकू (अझरबैजान), Rameshbabu Praggnanandhaa vs Magnus Carlsen, Chess World Cup 2023 Final : भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद (Rameshbabu Praggnanandhaa) याने फिडे बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत (FIDE World Cup Chess Tournament) जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याचा घामटा काढला आहे. प्रज्ञानानंद याने सलग दुसऱ्या दिवशी दुसरा डाव बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. अखेरची 35 मिनिटं अटीतटीची झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सामना बरोबरीत सोडण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे दुसरा डावही बरोबरीत सुटला आहे. आता उद्या प्रज्ञानानंद आणि कार्लसन यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही खेळाडूंच्या 20 चाली झाल्या तेव्हा प्रज्ञानानंद याचा वेळ एक तास सहा मिनिट झाला होता. तर कार्लसन याचा वेळ एक तास 18 मिनिट इतका नोंदवला गेला. भारताच्या 18 वर्षीय ग्रँडमास्टरने आपल्यापेक्षा अधिक अनुभवी आणि उच्च दर्जाच्या खेळाडूविरुद्ध प्रभावी कामगिरी केली.
बुधवारी आर. प्रज्ञानानंद याने कार्लसन याला झुंजवले होते. पहिला डाव बरोबरीत सोडला होता. बुधवारी पहिल्या क्लासिकल गेममध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसन याला प्रज्ञानानंद याने बरोबरीत रोखले. प्रज्ञानानंद याने 35 चालीनंतर बरोबरी साधण्यासाठी यशस्वी खेळी केली. प्रज्ञानानंद याने सेमीफायनलमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचा बुद्धीबळपटू फाबियानो याचा पराभव करत बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. प्रज्ञानानंद याने सेमीफायनलमध्ये 3.5-2.5 ने विजय मिळवत मोठा उलटफेर केला होता. आता फायनलमध्ये कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
We did it!! #1stcountry in the world to land on the lunar south pole!🇮🇳❤️ Such a Great feeling this is #Chandrayaan3 Also there is another hero Pragyaan Praggnanandhaa is just one step away to make us proud #fingerscrossed #praggnanandha #ChessChampion #ISRO
— BISWAJIT SAHOO (@BISWAJI66714668) August 23, 2023
Historic day for India - Chandrayan 3 soft lands on Moon.
— Vishu 🇮🇳 (@vishu49) August 23, 2023
Tomorrow morning a new Indian Chess Grandmaster rises - Rameshbabu Praggnanandhaa.
Bharat on the Go. #Chandrayaan3 #ISRO #Praggnanandhaa #Praggnanandhaa
भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे. प्रज्ञानानंद याने 2024 कँडिडेट्स स्पर्धेच्या यादीत आपले स्थान निश्चित केलं आहे. पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद हे आतापर्यंत कँडिडेट्सच्या स्पर्धेत खेळलेले एकमेव भारतीय आहेत. त्यानंतर आता प्रज्ञानानंदने कँडिडेट्स स्पर्धेतही धडक मारली आहे.
वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बुद्धीबळ
18 वर्षांचा आर. प्रज्ञानानंद हा मूळचा चेन्नईचा आहे. 2018 मध्ये प्रज्ञानानंदने ग्रँडमास्टर किताब पटकावला होता. प्रज्ञानानंदने वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ग्रँडमास्टर बनण्याचा इतिहास रचला होता. प्रज्ञानानंद वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बुद्धीबळ खेळत आहे.