Champions Trophy 2025 : दुष्काळात तेरावा महिना! स्टार खेळाडूने मालिकेतून घेतली माघार, अचानक गेला लंडनला; चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर
Champions Trophy 2025 PCB : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला.

PCB provides update on Saim Ayub : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला, कारण प्रमुख सलामीवीर सॅम अयुब (Saim Ayub) स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जखमी झाला होता आणि आता तो बराच काळपासून मैदानाबाहेर आहे. अयुबच्या उजव्या घोट्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला उपचारासाठी लंडनला पाठवण्यात आले.
कदाचित त्याची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (ICC Champions Trophy 2025) निवड होऊ शकते असे मानले जात होते, पण तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही आणि त्यामुळे त्याची निवड झाली नाही. आता पाकिस्तानने सॅमबाबत एक अपडेट दिली आहे, त्यानंतर तो न्यूझीलंड दौऱ्यातूनही बाहेर पडण्याची शक्यता आहे.
खरंतर, केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना सॅम अयुबला दुखापत झाली होती, त्यावेळी सामन्यात फलंदाजीही करू शकला नाही. यानंतर, पीसीबीने आपल्या स्टार खेळाडूला उपचारासाठी इंग्लंडला पाठवले, या आशेने की तो लवकरच तंदुरुस्त होईल. पण तसे झाले नाही आणि अयुबला चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावे लागले.
आता पाकिस्तानला मार्चमध्ये न्यूझीलंडचा दौरा करायचा आहे, अयुबला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. या कारणास्तव, न्यूझीलंड दौऱ्यावर खेळण्याची त्याची शक्यता अनेक गोष्टींवर अवलंबून असेल, ज्याची माहिती पीसीबीने दिली आहे.
हे उल्लेखनीय आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी होणार आहे आणि त्यानंतर पाकिस्तान संघ न्यूझीलंडचा दौरा करेल. तिथे पाकिस्तानी संघाला 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. हा दौरा 16 मार्चपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना 5 एप्रिल रोजी खेळला जाईल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघ -
मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आगा (उपकर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, उस्मान खान (यष्टीरक्षक), अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
भारत-पाकिस्तान सामना कधी रंगणार?
23 फेब्रुवारीला दुबईत भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहे. भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे एका गटात आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी 8 वर्षांनंतर होणार आहे, गेल्या वेळी 2017 मध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
हे ही वाचा -





















