Sourav Ganguly: 'आता माझं लक्ष...' बीसीसीआय अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सौरव गांगुली म्हणाले...
Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे. तसेच येत्या 18 ऑक्टोबरला बोर्डाला नवा अध्यक्ष मिळणार आहे.
Sourav Ganguly: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपणार आहे. तसेच येत्या 18 ऑक्टोबरला बोर्डाला नवा अध्यक्ष मिळणार आहे. भारताच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक (1983 World Cup) विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलेल्या महितीनुसार, रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सौरव गांगुली अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करतील, अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतलीय. सौरव गांगुलींना इतर वेगळ्या कामवर लक्ष केंद्रीत करायचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सौरव गांगुलींची प्रतिक्रिया
बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षाबाबत सुरु असलेल्या चर्चांवर सौरव गांगुलीनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली. प्रशासक म्हणून त्यांनी दीर्घ खेळी खेळली असून आता त्यांचे लक्ष इतर काही कामांवर आहे. मी बराच काळ प्रशासक राहिलो आहे. पण आता मी माझ्या आयुष्यात पुढे जातोय. मी टीम इंडियासाठी 15 वर्षे खेळलो, हे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ असेल. मी बीसीसीआयचा अध्यक्षही होतो. आता माझं लक्ष काहीतरी मोठं करण्यावर आहे.
बीसीसीआयच्या 36व्या अध्यक्षपादासाठी रॉजर बिन्नी सर्वोत्तम पर्याय
आठवड्याभराच्या गोंधळानंतर बोर्डाच्या 36व्या अध्यक्षपदासाठी बिन्नी हेच सर्वोत्तम पर्याय ठरले आहेत. "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांनीही बीसीसीआयचे सचिव म्हणून अर्ज दाखल केला आहे. जर कोणीही या पदासाठी अर्ज दाखल न केल्यास जय शाह दुसऱ्यांदा बीसीसीआयचे सचिव म्हणून कार्यरत राहतील. महत्वाचं म्हणजे, रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी, जय शाहनं सचिवपदासाठी, आशिष शेलार यांनी खजिनदारपदासाठी आणि देवजित सैकिया यांनी संयुक्त सचिवपदासाठी अर्ज दाखल केले आहेत", अशी माहिती बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिलीय.
सौरव गांगुलीला अध्यक्षपदावरून हटवण्यामागं भाजपचा हात, टीएमसीचा आरोप
“भाजपानं गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्यादरम्यान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पक्षात प्रवेश करणार असल्याची अफवा उठवली होती. परंतु, सौरव गांगुलींनी राजकारणात प्रवेश करणार असल्यांच्या वृत्तांना फेटाळून लावलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह ‘बीसीसीआय’च्या सचिवपदी सलग दुसऱ्यांदा कायम राहण्याची शक्यता आहे. मात्,र सौरव गांगुलीना पद नाकारण्यात आलंय, हे राजकीय सूडबुद्दीचं उदाहरण आहे, असा आरोप कुणाल घोष यांच्याकडून करण्यात आलाय.
रॉजर बिन्नीची क्रिकेट कारकीर्द
अष्टपैलू रॉजर बिन्नीनं 1979 ते 1987 मध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रॉजर बिन्नीनं 27 कसोटी सामन्यात 830 धावा केल्या आहेत. तर 72 एकदिवसीय सामन्यात 629 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये पाच तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक अर्धशतक झळकावलं आहे. रॉजर बिन्नीनं कसोटीत 11 तर एकदिवसीय सामन्यात 12 झेल घेतले आहेत. रॉजर बिन्नीनं 27 कसोटीमध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत. तर 72 एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स मिळवल्या आहेत. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा रॉजर बिन्नी महत्वाचा भाग होता. या विश्वचषकात रॉजर बिन्नीनं सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.
हे देखील वाचा-