Brendon Mccullum : इंग्रजीची मोठी खेळी; भारत दौऱ्यापूर्वी बदला टी-20 अन् वनडेचा कोच, 'बेझबॉल किंग'कडे दिली धुरा
Brendon Mccullum England Coach White Ball : इंग्लंडचा संघ जानेवारीमध्ये पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यासाठी भारतात येणार आहे, मात्र त्याआधी इंग्लंडने मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे.
Brendon McCullum England New White Ball Head Coach : भारतीय क्रिकेट संघ पुढील एक वर्ष बॅक टू बॅक क्रिकेट खेळणार आहे. भारताने अलीकडेच श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळली असून आता त्याला बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे, मात्र जानेवारीमध्ये भारताला इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे.
इंग्लंडचा संघ जानेवारीमध्ये पांढऱ्या चेंडूच्या दौऱ्यासाठी भारतात येणार आहे, मात्र त्याआधी इंग्लंडने मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. खरंतर, भारत दौऱ्यापूर्वी इंग्लंडने आपले वनडे आणि टी-20 मुख्य प्रशिक्षक बदलले आहेत.
आता मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्येही ब्रेंडन मॅक्क्युलमची इंग्लंडच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर, मॅथ्यू मॉटचा प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपला आणि आता न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलम त्याच्या जागी येणार आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा प्रशिक्षक असलेला मॅक्युलम आता 1 जानेवारी 2025 पासून इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 कोच म्हणून संघाची धुरा सांभाळणार आहे.
Introducing our new England Men's white-ball head coach! 🏏 ⚪
— England Cricket (@englandcricket) September 3, 2024
Our England Men's Test head coach! 🔴
म्हणजेच मॅक्युलम जानेवारी 2025 मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेपासून वनडे आणि टी-20 संघांचे प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करेल. आता तिन्ही फॉरमॅटचे प्रशिक्षक बनल्यानंतर टी-20 वर्ल्ड कप 2026, एकदिवसीय वर्ल्ड कप 2027, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 मध्ये इंग्लंडकडून चांगली कामगिरी करण्याचा भार ब्रेंडन मॅक्क्युलमच्या खांद्यावर असेल.
नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्तीबाबत मॅक्युलम म्हणाला, "मी हे नवीन आव्हान स्वीकारण्यास तयार आहे. मी कर्णधार जोस बटलरसोबत काम करण्यास उत्सुक आहे आणि संघाचा पाया मजबूत करण्यासाठी आधीच निर्णय घेतले जात आहेत.
हे ही वाचा -
Ajay Ratra : BCCIची मोठी घोषणा! अजित आगरकरच्या टीममध्ये नव्या सदस्याची एन्ट्री, कोण आहे अजय रात्रा?