IND vs AUS : इंदूर कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाचा फिल्डिंग प्रॅक्टिस करताना 'देसी जुगाड,' पाहा VIDEO
Border Gavaskar Trophy : भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना इंदूर येथे 1 मार्चपासून खेळणार आहे. पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने मालिकेत एक दमदार आघाडी घेतली आहे.
India vs Australia 3rd Test : टीम इंडिया (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून (बुधवार) इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान मालिकेतील आतापर्यंत झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये वाईटरित्या पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलियन संघावर इंदूर कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करण्याचं खूपच दडपण आहे. अशामध्ये कांगारू संघाच्या क्षेत्ररक्षण सरावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू बोरोवेक यांनी संघाचे क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी पिच रोलर्स, स्टील बोर्ड अशा काही गोष्टींचा वापर करुन अगदी 'देसी जुगाड' केला आहे.
पाहा VIDEO-
Rollers, footys, steel sheets - the Aussies are getting innovative with their fielding sessions in India #INDvAUS pic.twitter.com/nyTSmjEDjp
— cricket.com.au (@cricketcomau) February 26, 2023
पहिल्या 2 कसोटी सामन्यांदरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाचे स्लिप क्षेत्ररक्षण अत्यंत खराब होते, ज्यात नागपूर कसोटी सामन्यातील महत्त्वाच्या वेळी स्टीव्ह स्मिथने स्लिपमध्ये जाडेजाचा झेल सोडला. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सहाय्यक प्रशिक्षकाने चेंडूला डिफ्लेट करण्यासाठी क्षेत्ररक्षणाची एक अनोखी प्रॅक्टिस घेत आहेत. यामुळे खेळाडू आपले पूर्ण लक्ष चेंडूवर ठेवून तो पकडण्याचा प्रयत्न करू शकतील. इंदूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याची खेळपट्टी लाल मातीची असेल, अशा परिस्थितीत सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्लिप फिल्डिंगमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून ही युक्ती ऑस्ट्रेलियन संघाने अवलंबली आहे. भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.
भारतीय संघाचाही सराव सुरु
दिल्ली कसोटी सामना संपल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंना छोटा ब्रेक मिळाला, त्यानंतर टीम इंडियाचे सर्व खेळाडू आता इंदूरला पोहोचले आहेत. याठिकाणी 1 मार्चपासून मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्याबाबत केएल राहुलच्या जागी शुभमन गिलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय भारतीय संघात अन्य बदलाची अपेक्षा नाही. त्याचबरोबर मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीन यांचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी संभाव्य संघ
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलियन संघ : स्टीव स्मिथ (कर्णधार), स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमरन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुह्नमॅन.
हे देखील वाचा :