Ben Stokes VIDEO : अरेरे! बेन स्टोक्सच्या अवघड जागी लागला चेंडू, चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला, व्हिडिओ व्हायरल
England vs India 4th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यातील मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे.

England vs India 4th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यातील मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज विकेटसाठी झगडत आहे. त्याचवेळी मोहम्मद सिराजने टाकलेली एक जबरदस्त वेगवान चेंडू थेट इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या अवघड जागी लागला आणि तो वेदनांनी तडफडत मैदानावरच बसला.
अरेरे! बेन स्टोक्सच्या अवघड जागी लागला चेंडू
मोहम्मद सिराज त्याची 18 वी ओव्हर टाकत होता, त्यावेळी त्याचा तिसरी चेंडू अचानक बॅक ऑफ लेंथवरून आत आला. स्टोक्सने बचावाचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या आतील कडेवरून थेट अवघड जागी लागला. चेंडू लागल्या क्षणीच स्टोक्स विव्हळत तिथेच बसला. काही क्षण तर ते उठूही शकला नाहीत. मोहम्मद सिराज लगेच त्याच्या जवळ गेला आणि त्याची विचारपूस केली. स्टोक्सने हसून मान हलवली, पण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट वेदना दिसत होत्या. त्यावेळी चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे, थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.
Thoughts and prayers for Ben Stokes 😅😅😅 pic.twitter.com/2RiAGkOKLF
— England Cricket (@englandcricket) July 25, 2025
बेन स्टोक्सचा पराक्रम
बेन स्टोक्सने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या, ज्याच्या आधारे इंग्लंडने भारताला 358 धावांवर रोखले. स्टोक्सने पाचव्यांदा कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. कसोटी क्रिकेटमध्ये पाच वेळा पाच विकेट्स आणि 10 पेक्षा जास्त शतके करणारा तो जगातील फक्त चौथा अष्टपैलू खेळाडू आहे. पाच विकेट्स घेण्याची ही कामगिरी स्टोक्ससाठी देखील खास होती कारण त्याने 8 वर्षांनंतर एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली. त्याने शेवटची कामगिरी 2017 मध्ये केली होती.
जो रूटने शतक झळकावले
बेन स्टोक्सने आपली हुशारी दाखवली आणि जो रूटनेही मँचेस्टर कसोटीत शतक झळकावले. या उजव्या हाताच्या फलंदाजाने कसोटीत त्याचे 38 वे शतक झळकावले. रूटने या मालिकेत दुसरे शतक झळकावले आहे. रूटने एका देशात भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला आहे. त्याने इंग्लंडमध्ये भारताविरुद्ध 1900 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ संपला!
तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. इंग्लंडने भारताविरुद्ध चार विकेट गमावून 433 धावा केल्या आहेत. यासह, इंग्लंडने भारतावर 75 धावांची आघाडी घेतली आहे. सध्या, रूट 121 धावांसह क्रिजवर आहे आणि स्टोक्स 36 धावांसह क्रिजवर आहे. त्यामुळे इंग्लंडकडे आता मोठी आघाडी घेण्याची मोठी संधी आहे.





















