Ben Austin Dies News : एक चेंडू, आणि सर्व संपलं… भारत-ऑस्ट्रेलिया मॅचआधी 17 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सरावादरम्यान नेमकं काय घडलं?
Ben Austin Australia Cricketer Marathi News : सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर असून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे.

Australia cricketer Ben Austin Dies : सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर असून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे, पण त्याआधीच या दु:खद घटनेची बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात 17 वर्षीय तरुण क्रिकेटपटू बेन ऑस्टिन (Ben Austin) याचा सरावादरम्यान चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं असून, क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही अधिकृत निवेदन जारी करून दु:ख व्यक्त केले आहे.
बेन ऑस्टिनसोबत नेमकं काय घडलं?
ही घटना मेलबर्नच्या पूर्व भागात घडली. बेन ऑस्टिन (Ben Austin) नेट प्रॅक्टिसदरम्यान फलंदाजी करत असताना चेंडू थेट त्याच्या डोक्यावर जाऊन लागला. ज्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण दोन दिवसांनंतर म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी गुरुवार त्याचा मृत्यू झाला. (Melbourne cricketer Ben Austin, 17, dies after being hit by ball)
Vale Ben Austin.
— Cricket Australia (@CricketAus) October 30, 2025
Cricket Australia is devastated at the passing of 17-year-old Melbourne cricketer Ben Austin following an accident while batting in the nets on Tuesday night. pic.twitter.com/zBifuqrrRG
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केला शोक
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ‘एक्स’ (Twitter) वर पोस्ट करत लिहिले आहे की, “17 वर्षीय मेलबर्न क्रिकेटर बेन ऑस्टिनच्या निधनाने आम्ही स्तब्ध आहोत. नेट्समध्ये सराव करताना झालेल्या या अपघाताने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं आहे.” तर क्रिकेट व्हिक्टोरियानेही शोक व्यक्त करत म्हटले आहे की, “आमच्या संवेदना ऑस्टिन कुटुंबीयांसोबत, त्याच्या सहकाऱ्यांसोबत आणि फर्नट्री गली क्रिकेट क्लब तसेच व्हिक्टोरियन क्रिकेट समुदायासोबत आहेत.”
सरावादरम्यान अपघात, रुग्णालयात जीवन-मृत्यूची झुंज
बेन ऑस्टिन हा फर्नट्री गली क्रिकेट क्लब आणि एल्डन पार्क यांच्यातील स्थानिक टी-20 सामन्यापूर्वी नेट्समध्ये वॉर्म-अप करत होता. सरावादरम्यान चेंडू डोक्यावर लागल्याने तो गंभीर जखमी झाला. सहकाऱ्यांनी तात्काळ मदत केली. प्राथमिक उपचारानंतर बेन ऑस्टिनला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. रिंगवुड अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मायकेल फिन यांनी त्यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सर्व प्रयत्नांनंतरही बेन ऑस्टिनला वाचवता आले नाही. क्रिकेट जगताला हादरवणारी ही घटना पुन्हा एकदा क्रिकेटमधील सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.
Cricket Victoria is deeply saddened & shocked at the passing of 17-year-old Ben Austin from Ferntree Gully Cricket Club.
— Cricket Victoria (@cricketvictoria) October 30, 2025
Our sincere love & thoughts are with the Austin family, Ben’s teammates, Ferntree Gully Cricket Club and the Victorian cricket community
Vale Ben. pic.twitter.com/uj9dECiTrB
2014 च्या घटनेची झाली आठवणी
बेनच्या निधनाने संपूर्ण क्रिकेटविश्वाला पुन्हा एकदा 2014 मधील फिलिप ह्यूजच्या दुःखद मृत्यूची आठवण करून दिली. 2014 मध्ये शेफिल्ड शिल्डच्या सामन्यात खेळताना ह्यूजच्या मानेला चेंडू लागला होता आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुरक्षेचे आणि कंकशन प्रोटोकॉल्स अधिक कठोर केले होते. मात्र, ऑस्टिनच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा खेळाच्या मैदानावरील सुरक्षेच्या निकषांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
View this post on Instagram
हे ही वाचा -





















