Ranji Trophy Rescheduled: कोरोनाचा धोका (Corona) पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांना याचा फटका बसत असून भारताच्या स्थानिक क्रिकेटमधील अत्यंत मानाची स्पर्धा असणारी रणजी ट्रॉफी स्पर्धाही (Ranji Trophy) पुढे ढकलण्यात आली आहे. 13 जानेवारीपासून सुरु होणारी ही स्पर्धा आता पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी एबीपी न्यूजशी बोलताना दिली. मागील वर्षी भारतीय क्रिकेटच्या (Indian Cricket) 87 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धा रद्द झाली होती. त्यानंतर यावर्षी स्पर्धा वेळेत होईल असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा फटका स्पर्धेला बसला आहे.


भारतीय क्रिकेटची सर्वोच्च स्पर्धा म्हणून रणजी करंडक स्पर्धा ओळखली जाते. पण यंदाच्या रणजी करंडकाचे सामने होण्यावर यंदाही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रणजी करंडक स्पर्धा 13 जानेवारीपासून न खेळवता पुढे ढकलण्यात आली  आहे. पुढील तारखेबाबत अद्याप माहिती मिळाली नसली तरी तूर्तास स्पर्धेला विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गांगुली यांनी एबीपीशी बोलताना ही माहिती दिल्यानंतर बीसीसीआयने याबाबत ट्वीट करत याची पुष्टी केली आहे.


 


भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक


भारतात रणजी सामन्यांची सुरुवात 1934 सालापासून करण्यात आली. रणजी हे नाव क्रिकेटपट्टू रणजितसिंह यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे. तेव्हापासून मागील वर्षापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणताही खंड पडला नव्हता. पण कोरोनामुळे पुन्हा एकदा या सामन्यांच्या आयोजनात खंड पडणार आहे. 


 





हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha