IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात येत आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे अडचणीत वाढ झाली होती. त्यातल्या त्यात भर म्हणून दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा सामना संपण्यापूर्वी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आपली चौथी ओवर टाकताना हॅमस्ट्रिंगवर ताण आल्यामुळे मैदानातून माघारी परतावं लागलं. ज्यावेळी सिराज आपली शेवटची ओव्हर टाकत होता, त्यावेळी त्याला ही दुखापत झाली. दुखापतीमुळं सिराजला मैदातून माघारी परतावं लागलं.
आपला रन-अप घेतल्यानंतर तो क्रिजवर बॉल टाकण्यासाठी पोहोचला. पण त्याचवेळी त्याला वेदना जाणवू लागल्या, त्यामुळे तो आपली ओव्हर टाकू शकला नाही. सिराजला होणारा त्रास पाहून फिजियो मैदानावरच पोहोचले. त्यानंतर सिराज मैदानातून माघारी परतला. त्यानंतर शिल्लक राहिलेली ओव्हर शार्दुल ठाकूरनं पूर्ण केली. दरम्यान, बीसीसीआयकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
पहिल्या दिवसाअखेर भारताकडे 167 धावांची आघाडी, दक्षिण आफ्रिका 35/1
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत भारताकडून खराब फलंदाजीचं दर्शन घडलं आहे. तर दुसरीकडे आधी भेदक गोलंदाजी केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने विश्वासात्मक सुरुवात करत दिवसअखेर केवळ एक विकेट गमावली आहे.
जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. यावेळी केएल राहुल आणि आर आश्विन सोडता एकाही खेळाडूला खास कामगिरी करता न आल्याने भारताचा डाव 202 धावांवर आटोपला. सामन्याची सुरुवात होताच भारताचे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. सलामीवीर मयांक 26 धावांवर बाद होताच पुजारा (3) आणि रहाणे (0) लगेच बाद झाले. मग पुढील खेळाडूही पटपट बाद झाले. दरम्यान आश्विनने मात्र धडाकेबाज 46 धावा झळकावल्या ज्यामुळे भारताचा डाव काहीसा सावरला. अखेर बुमराहने दोन चौकार आणि एक षटकार ठोकत 11 चेंडूत 14 धावा केल्या. ज्यामुळे भारताचा 200 धावांचा आकडा पार झाला. 202 धावांवर भारता पहिला डाव संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने फलंदाजीची सुरुवात केली. यावेळी चौथ्याच ओव्हरमध्ये शमीने मार्करमला पायचीत करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पण नंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत एल्गर आणि पीटरसन यांनी क्रिजवर टीकून राहत 35 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.