India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघ काहीसा पिछाडीवर पडत असल्याचं वाटत होतं, पण युवा अष्टपैलू शार्दूल ठाकूरने भेदक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या निम्म्या संघाला तंबूत धाडलं. ज्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सेशनच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेची स्थिती 191 वर 7 बाद अशी झाली आहे.


दुसऱ्या कसोटीच्या पहिल्यादिवशी भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीला सुरुवात केली असता पहिल्या दिवशीच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका संघाने 1 विकेट गमावत 35 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर शार्दूलने आफ्रिकेचे तीन गडी पटापट बाद केले. पण त्यानंतर बावुमा आणि काईल या जोडीने डाव सावरला आणि धावसंख्या 160 च्या पुढे पोहोचवली. पण 162 धावांवर काईल बाद होताच 177 धावांवर बावुमाही बाद झाला. नंतर लगेचच शमीने रबाडालाही तंबूत धाडलं. ज्यामुळे 70 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेची स्थिती 191 धावांवर 7 बाद अशी असून जेन्सन आणि महाराज हे दोघे क्रिजवर आहेत. 



कसा होता पहिला दिवस


सामन्याची सुरुवात होताच भारताचे महत्त्वाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतत होते. सलामीवीर मयांक 26 धावांवर बाद होताच पुजारा (3) आणि रहाणे (0) लगेच बाद झाले. मग पुढील खेळाडूही पटपट बाद झाले. दरम्यान आश्विनने मात्र धडाकेबाज 46 धावा झळकावल्या ज्यामुळे भारताचा डाव काहीसा सावरला. अखेर बुमराहने दोन चौकार आणि एक षटकार ठोकत 11 चेंडूत 14 धावा केल्या. ज्यामुळे भारताचा 200 धावांचा आकडा पार झाला. 202 धावांवर भारता पहिला डाव संपल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने फलंदाजीची सुरुवात केली. यावेळी चौथ्याच ओव्हरमध्ये शमीने मार्करमला पायचीत करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पण नंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत एल्गर आणि पीटरसन यांनी क्रिजवर टीकून राहत 35 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. 


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha