South Africa Announced Team For India ODI Series : दक्षिण आफ्रीका क्रिकेटने भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी नेदरलँडविरुद्ध अप्रतिम प्रदर्शन करणारे अष्टपैलू खेळाडू वेन पार्नेल आणि ज़ुबैर हमजा यांना संघात स्थान मिळालं आहे. तर डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जानसेन पहिल्यांदाच वनडे संघात निवडले गेला आहे. टेम्बा बावुमा याने पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी केली होती. त्यानंतर आता तो एकदिवसीय संघाचा कर्णधार असून त्याच्या कामगिरीकडे सर्वांते लक्ष असेल.



कसा आहे दक्षिण भारतीय संघ - टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज (उपकर्णधार), क्विंटन डिकॉक, जुबैर हमजा, मार्को जानसेन, जानेमन मालन, सिसांडा मगला, एडन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पार्नेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कागीसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वान डर डूसन आणि काइल वेरेने.


कसा आहे भारतीय संघ -  के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज


एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक - 


19 जानेवारी 2022 - बोलंड पार्क, पार्ल - दुपारी दोन वाजता
21 जानेवारी 2022 - बोलंड पार्क, पार्ल - दुपारी दोन वाजता
23 जानेवारी 2022 - न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन - दुपारी दोन वाजता



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live