Ind vs SA, 1st Innings Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना सध्या सुरु आहे. जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियमवर (The Wanderers Stadium, Johannesburg) सुरु असलेल्या या सामन्यात भारत सध्या दुसरा डाव खेळत असून 58 धावांच्या आघाडीवर दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे. आधी शार्दूल ठाकूरच्या सात विकेट्सच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 229 धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताने 27 धावांच्या पिछाडीवरुन खेळण्यास सुरुवात केली. ज्यानंतर दिवसाच्या शेवटी 82 धावा करत भारताने दोन गडी गमावत 58 धावांची आघाडी घेतली आहे.   



आतापर्यंत सामन्यात पहिल्यादिवशी भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीला सुरुवात केली असता पहिल्या दिवशीच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका संघाने 1 विकेट गमावत 35 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर शार्दूलने आफ्रिकेचे तीन गडी पटापट बाद केले. पण त्यानंतर बावुमा आणि काईल या जोडीने डाव सावरला आणि धावसंख्या 160 च्या पुढे पोहोचवली. पण 162 धावांवर काईल बाद होताच 177 धावांवर बावुमाही बाद झाला. नंतर लगेचच शमीने रबाडालाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मार्को आणि महाराज यांनी आठव्या गड्यासाठी काही धावा केल्या पण महाराजला बुमराहने (Jasprit Bumrah) बाद करताच शार्दूलने अखेरचे दोन गडी बाद करत आफ्रिकेला 229 धावांत सर्वबाद केलं.


ज्यानंतर भारताने फलंदाजीला सुरुवात केली आहे. पण कर्णधार राहुल 8 धावांवर लगेच बाद झाला. काही वेळात मयांकही 23 धावा करुन तंबूत परतला. पण पुजारा (35*) आणि रहाणेने (11*) सध्या भारताचा डाव सांभाळला असून भारताची स्थिती 82 वर 2 बाद अशी आहे. भारताला सामना जिंकण्यासाठी या डावात एक मोठी आघाडी घेणं गरजेचं आहे.


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha