Impact Player Rule : आता आयपीएलमध्ये 11 नाही, तर 15 खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार संघ, बीसीसीआय नवा नियम लागू करण्याच्या तयारीत, वाचा सविस्तर
BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ हा नियम सादर केला असून हा लागू केल्यास आता टी20 सामन्यांत टीममध्ये 11 नाही तर 15 खेळाडू असणार आहेत.
![Impact Player Rule : आता आयपीएलमध्ये 11 नाही, तर 15 खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार संघ, बीसीसीआय नवा नियम लागू करण्याच्या तयारीत, वाचा सविस्तर BCCI May introduce Impact Player Rule in T20 matches then not 11 but 15 players will be in team know details Impact Player Rule : आता आयपीएलमध्ये 11 नाही, तर 15 खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार संघ, बीसीसीआय नवा नियम लागू करण्याच्या तयारीत, वाचा सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/17/82822604684f5cef0f3281a8c03a78a11663425578925143_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
BCCI Introduce Imact Player Rule : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI) T20 क्रिकेटमध्ये एक नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. बीसीसीआयने आणलेल्या या नियमानंतर आता संघ 11 ऐवजी 15 खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो. या नियमाचे नाव आहे, इम्पॅक्ट प्लेअर रुल (Impact Player Rule). क्रिकेटआधी फुटबॉल आणि हॉकीसारख्या खेळांमध्ये लागू असलेला हा नियम ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश प्रिमीयर लीगमध्ये लागू आहे. बीसीसीआयही आता हा नियम लागू करण्याच्या तयारीत असल्याने आयपीएल 2023 मध्येही याची अंमलबजावणी केली जाईल, अशीही माहिती समोर येत आहे.
नक्की काय आहे इम्पॅक्ट प्लेअर रुल?
इम्पॅक्ट प्लेयर या नियमानुसार सामन्यात अतिरिक्त खेळाडूंना संघात ठेवता येणार आहे. म्हणजेच जेव्हा सामन्यात नाणेफेक होईल, त्या वेळी दोन्ही संघांचे कर्णधार चार पर्यायी खेळाडूंच्या पर्यायासह त्यांची प्लेईंग इलेव्हन जाहीर करतील. अर्थात या चार पर्यायी खेळाडूंपैकी एकच खेळाडू समन्यात वापरता येईल, यासाठी संघात खेळत असलेल्या एखाद्या खेळाडूला मध्येच थांबवून पर्यायी खेळाडूला खेळवता येऊ शकते. विशेष म्हणजे कोणत्याही संघाने इम्पॅक्ट प्लेयर वापरायलाच हवा अशी सक्ती नाही. तसंच बीसीसीआयच्या या नियमानुसार कोणत्याही डावाची 14 षटकं पूर्ण होण्यापूर्वी इम्पॅक्ट प्लेअरला वापरता येऊ शकतं.
राज्यांना पाठवलं परिपत्रक
बीसीसीआयचा हा नवीन नियम 'इम्पॅक्ट प्लेअर रुल' ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये एक्स फॅक्टर म्हणून ओळखला जातो. दरम्यान अशीही माहिती समोर येत आहे की, जर बीसीसीआयचा इम्पॅक्ट प्लेअर रुल देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये यशस्वी झाला तर तो आयपीएल 2023 मध्ये लागू केला जाऊ शकतो. बीसीसीआयने या नियमांतर्गत सर्व राज्यांना एक परिपत्रक पाठवलं आहे, ज्यामध्ये टी-20 क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहता आता काहीतरी नवीन आणण्याची तयारी सुरू असल्याचं म्हटलं आहे. यामुळे खेळाडू आणि संघांसाठी हा खेळ अधिक मनोरंजक बनवता येईल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)