Serious Injury Replacement : ऋषभ पंतमुळे BCCIची क्रांतिकारी घोषणा! आता जखमी खेळाडूंसाठी ‘सब्स्टिट्यूट’ पर्याय, जाणून घ्या नवीन नियम
भारतीय विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतला नुकत्याच इंग्लंड दौऱ्यात गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला.

BCCI new rule Serious Injury Replacement : भारतीय विकेटकीपर-फलंदाज ऋषभ पंतला नुकत्याच इंग्लंड दौऱ्यात गंभीर दुखापतींचा सामना करावा लागला. लॉर्ड्स कसोटीत यष्टिरक्षण करताना त्याच्या बोटाला इजा झाली होती. तर मॅंचेस्टर कसोटीत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. पंतच्या या दुखापतीमुळे अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेत टीम इंडियासाठी चिंता वाढली होती. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी हंगामासाठी एक नवा नियम आणला आहे.
बीसीसीआयचा नवा नियम
🚨 NEW RULE INTRODUCED 🚨
— Tanuj (@ImTanujSingh) August 16, 2025
- BCCI introduces "Serious Injury Replacement" rule for 2025-26 season in multi-day formats, allowing a like-for-like replacement somewhat similar to concussion replacement, in case of a major injury to any player. (Cricbuzz). pic.twitter.com/Z4hkOE0idF
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेटमधील मल्टी-डे सामन्यांसाठी ‘सीरियस इंजुरी रिप्लेसमेंट’ हा नवा नियम लागू केला आहे. हा नियम 2025-26 हंगामापासून प्रभावी होणार आहे. मल्टी-डे सामन्यात एखादा खेळाडू गंभीर दुखापतीमुळे खेळू शकत नसल्यास, त्या खेळाडूच्या ऐवजी सेम पात्रता असलेला बदली खेळाडू त्वरित मैदानात उतरवता येईल. यासाठी निवड समिती आणि सामनाधिकाऱ्यांची (मॅच रेफरी) मंजुरी घ्यावी लागणार आहे.
हा नियम लागू करण्यामागील उद्देश म्हणजे, दुखापतीमुळे संघाच्या रणनितीवर परिणाम होऊ नये. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या पंचांच्या कार्यशाळेत या नव्या नियमाची माहिती देण्यात आली आहे. मात्र हा नियम मर्यादित षटकांच्या स्पर्धांसाठी लागू होणार नाही.
सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा किंवा विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत अशा प्रकारची बदली खेळाडूंची परवानगी मिळणार नाही. मात्र सी.के. नायडू अंडर-19 ट्रॉफीसारख्या मल्टी-डे स्पर्धेत हा नियम लागू राहील. आयपीएलसाठी हा नियम लागू करायचा की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
🚨 NEW RULE 🚨
— Cricbuzz (@cricbuzz) August 16, 2025
BCCI introduces 'Serious Injury Replacement' rule for 2025-26 season in multi-day formats, allowing a like-for-like replacement - somewhat similar to concussion replacement - in case of a major injury to any player.#CricketTwitter pic.twitter.com/C9WGOEHyh9
आयसीसीचा नियम काय सांगतो?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनुसार (ICC) खेळाडूची बदली केवळ कन्कशन (डोक्यावर झालेली दुखापत) झाल्यासच करता येते. अशा परिस्थितीत खेळाडू सात दिवस कोणत्याही प्रकारचा सामना खेळू शकत नाही. कन्कशन सब्स्टिट्यूट हा नियम केवळ डोक्याला इजा झालेल्या आणि खेळ पुढे सुरू ठेवणे शक्य नसलेल्या खेळाडूंकरिताच लागू असतो.
हे ही वाचा -





















