एक्स्प्लोर

Bananas scam For BCCI : क्रिकेटपटूंनी 35 लाखांची केळी खाल्ली, BCCI ला हायकोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

आशिया कप 2025 वर सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 9 सप्टेंबरपासून आठ संघांमध्ये या स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली आहे.

Bananas scam For BCCI : आशिया कप 2025 वर सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 9 सप्टेंबरपासून आठ संघांमध्ये या स्पर्धेची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आज म्हणजेच 10 सप्टेंबरला टीम इंडिया पहिल्यांदा मैदानात उतरणार आहे. पण यादरम्यान एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला नोटीस बजावण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्यात लाखो रुपये केवळ केळ्यांवर खर्च केल्याचा आरोप आहे. हा नेमका घोटाळा काय आहे? तो चर्चेत कसा आला? आणि त्याचे धागेदोरे बीसीसीआयशी कसे जोडले गेले? हे जाणून घेऊया...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयला उत्तराखंड उच्च न्यायालयाने तब्बल 12 कोटी रुपयांच्या गैरवापराच्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनला दिलेल्या निधीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याचे उघड झाले आहे आणि याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, या 12 कोटींपैकी तब्बल 35 लाख रुपये केवळ खेळाडूंसाठी केळी खरेदी करण्यावर खर्च करण्यात आल्याचे ऑडिट अहवालात नमूद आहे. याशिवाय खेळाडूंना फळे देण्याच्या नावाखाली आणि इतर बाबींमध्येही प्रचंड रकमेचा उधळपट्टीत वापर झाल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

केळ्यांवर खर्चले 35 लाख रुपये?

टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, उत्तराखंड उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, 12 कोटींपैकी तब्बल 35 लाख रुपये केवळ केळी खरेदीसाठी खर्च करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 सप्टेंबरला होणार असून, बीसीसीआयलाही यावर आपले उत्तर द्यावे लागणार आहे.

उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या ऑडिट अहवालानुसार, इव्हेंट मॅनेजमेंटसाठी तब्बल 6.4 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच टूर्नामेंट व ट्रायल्सवर एकूण 26.3 कोटी रुपये उधळले गेले, जे मागील आर्थिक वर्षाच्या 22.3 कोटी रुपयांच्या तुलनेत जास्त आहेत. याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, उत्तराखंड असोसिएशनने खाण्यापिण्याच्या खर्चाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला आहे.

उत्तराखंड क्रिकेट बोर्डचे वाद

उत्तराखंड क्रिकेट बोर्डावर याआधीही गंभीर गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. 2022 मध्ये उघड झाले होते की, खेळाडूंना 12 महिन्यांच्या काळात सरासरी दररोज केवळ 100 रुपये दिले जात होते, जे राज्यातील किमान वेतनापेक्षाही कमी आहे. एवढेच नव्हे, तर उत्तराखंड संघातील खेळाडूंनी मानसिक आणि शारीरिक शोषणाचेही आरोप केले होते. उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनने अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्येही प्रचंड गैरव्यवहार केला होता.

हे ही वाचा -

Prithvi Shaw Sapna Gill Case Update : तुला ही शेवटची वॉर्निंग...; मुलीच्या छेडछाड प्रकरणात पक्का फसला पृथ्वी शॉ, मुंबई हायकोर्टाने ठोठावला दंड

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget