एक्स्प्लोर

Sarfaraz Khan : टीम इंडियात स्थान मिळवण्यात सरफराज खानचा धर्म आडवा आला? निवड समितीच्या माजी प्रमुखाने स्पष्टच सांगितलं...

दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध होणाऱ्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या भारतीय ‘अ’ संघात मधल्या फळीतला फलंदाज सरफराज खानला स्थान देण्यात आलेले नाही.

Sarfaraz Khan Selection India A Religion Controversy : दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध होणाऱ्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांसाठी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या भारतीय ‘अ’ संघात मधल्या फळीतला फलंदाज सरफराज खानला स्थान देण्यात आलेले नाही. त्याला संघात संधी न मिळाल्याने राजकीय स्तरावर मोठी चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणावर बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता एम.एस.के. प्रसाद यांनी मोठं विधान केलं आहे.

माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी धर्माचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल टीकाकारांना फटकारले. एम.एस.के. प्रसाद म्हणाले की, “निवड समिती कधीही कोणत्याही खेळाडूचा धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमी पाहून निर्णय घेत नाही. जे लोक असं मानतात, त्यांना भारतीय क्रिकेटची अजिबात जाण नाही. सरफराज खानचा मुद्दा सोडा, सर्वसाधारणपणे कोणत्याही खेळाडूची निवड होत असताना प्रांत, समाज किंवा धर्म या गोष्टींचा विचार केला जात नाही. पण एखादा खेळाडू संघाबाहेर राहिला की अशा चर्चा का रंगतात? सगळ्यांना माहीत आहे की सरफराज खानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. निवडकर्त्यांकडे त्याच्या निवडीबाबत काही कारणं असतील, ती ते स्पष्ट करू शकतात.”

एम.एस.के. प्रसाद हे 2016 ते 2020 या कालावधीत बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता होते. सरफराज खानला भारतीय ‘अ’ संघात स्थान न मिळाल्यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी एक्स (माजी ट्विटर) वरून प्रतिक्रिया देत या निर्णयावर सवाल उपस्थित केला आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही जबाबदार धरले.

शमा मोहम्मद यांची प्रतिक्रिया

शमा मोहम्मद यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं, “सरफराज खानला त्याच्या आडनावामुळे संघात स्थान देण्यात आलं नाही का? फक्त विचारत आहे... आपण सगळे जाणतो की या बाबतीत गौतम गंभीर यांची विचारसरणी काय आहे.”

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आयुष म्हात्रे, एन जगदीसन (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, हर्ष दुबे, तनुष कोटियन,मानव सुथार, अंशुल कंबोज, यश ठाकूर, आयुष बडोनी, सरांश जैन.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ : ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), साई सुदर्शन (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, हर्ष दुबे, तनुष कोटियन, मानव सुथार, खलील अहमद, गुरनूर ब्रार, अभिमन्यू इसवरन, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

हे ही वाचा -

Ind vs Aus 3rd : टीम इंडिया मालिका हरली, पण रोहित शर्मा एक ट्रॉफी जिंकली, मुंबईच्या पोरानं ऑस्ट्रेलियात 3 सामन्यात किती धावा ठोकल्या?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास
Sanjay Raut Full PC : पवारांचा पक्ष फोडण्यासाठी गौतम अदानींच्या भावाचा संबंध, संजय राऊतांचा आरोप
Chandrapur Kidney Case : चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणाचे चीन कनेक्शन,SIT च्या तपासा धक्कादायक माहिती
Gautam Adani at Baramati : उद्योगपती गौतम अदानीही बारामतीत दाखल, रोहित पवारांनी केलं गाडीचं सारथ्य
Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Krishnaraaj Mahadik: कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
कृष्णराज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून घेणार माघार! खासदार धनंजय महाडिकांचा तगडा निर्णय!
'नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत, एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत' मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?
'नवीन अध्यायाला सुरुवात आम्ही करत आहोत, एका विचारानं आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत' मुंबईत वंचितसोबत आघाडी होताच हर्षवर्धन सपकाळ काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, शिवसेनेची लवकरच पहिली यादी; प्रकाश महाजनांनाही नवी जबाबदारी
एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, शिवसेनेची लवकरच पहिली यादी; प्रकाश महाजनांनाही नवी जबाबदारी
'प्रत्येक भारतीयाने दक्षिणेकडील एक भाषा शिकली पाहिजे, मी स्वत: शिकण्याचा प्रयत्न करत आहे' देशव्यापी हिंदीचा वरंवटा सुरु असतानाच केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानांचा सल्ला
'प्रत्येक भारतीयाने दक्षिणेकडील एक भाषा शिकली पाहिजे, मी स्वत: शिकण्याचा प्रयत्न करत आहे' देशव्यापी हिंदीचा वरंवटा सुरु असतानाच केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानांचा सल्ला
Embed widget