BCCI ची 20203-24 मध्ये 9,741 कोटींची कमाई, सर्वाधिक कमाई IPL मधून, बीसीसीआयला कुठून पैसे मिळाले?
BCCI Earnings From IPL: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय IPL आणि WPL मधून मोठी कमाई करते. बीसीसीआयनं सर्वाधिक कमाई आयपीएलमधून केली आहे.

BCCI Earnings: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआयला आंतरराष्ट्रीय सामन्यांसोबत आयपीएलमधून उत्पन्न मिळतं. अलीकडे समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीआयनं 50 टक्क्यांपेक्षा अधिक कमाई आयपीएलमधून केली आहे. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार 2023-24 मध्ये 9741 कोटी रुपयांची कमाई केली. बोर्डाची कमाई गेल्या दोन वर्षात 5 हजार कोटींनी वाढली आहे.
बीसीसीआनं पैसे कशातून कमावले?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहे. बीसीसीआयकडे आयसीसीचे शेअर्स देखील आहेत, ज्यातून कोट्यवधी रुपये येतात. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलमधून देखील मोठी कमाई होते. याशिवाय सामन्यांच्या तिकीट विक्रीतून आणि व्यावसायिक राइटसच्या विक्रीतून मोठी कमाई होते. बीसीसीआयला जगातील सर्वात मोठं क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखलं जातं.
मायखेलच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयनं 2023-24 मध्ये आयपीएलमधून 5761 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 1042 कोटी रुपयांची कमाई आयसीसीच्या शेअरमधून केली आहे. बोर्डानं ठेवी आणि गुंतवणुकीतून 987 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याशिवाय डब्ल्यूपीएलमधून 378 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तिकीट विक्री आणि व्यावसायिक राईटस विक्रीतून बीसीसीआयनं 361 कोटी रुपये कमावले आहेत.
बीसीसीआयची कमाई 3000 कोटींनी वाढली
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं 2023-24मध्ये 9741 कोटी रुपयांची कमाई केली. तर 2022-23 मध्ये बीसीसीआयनं 6820 कोटी रुपये कमावले आहेत. यावरुन लक्षात येतं की बीसीसीआयची कमाई 2023-24 मध्ये 2921 कोटी रुपयांनी वाढली आहे. तर, 2021-22 मध्ये बीसीसीआयनं 4230 कोटी कमावले होते. दोन वर्षात बीसीसीआयची कमाई 5 हजार कोटींनी वाढली आहे.




















