Monty Panesar on Virat Kohli : इंग्लंडचा माजी दिग्गज फिरकीपटू माँटी पानेसर (Monty Panesar) याने विराट कोहली (Virat Kohli) याची तुलना थेट दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्याशी केली आहे. कोहलीच्या खराब फॉर्मबाबत प्रतिक्रिया देताना पानेसरने हे वक्तव्य केलं आहे. कोहली हा रोनाल्डोप्रमाणे असून त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्याला बीसीसीआयने ड्रॉप केल्यास बीसीसीआयची स्पॉनसरशीप कमी होऊ शकते, म्हणूनच कोहलीला ड्रॉप करण्याची जोखीम बीसीसीआय घेत नाही.
टाइम्स ऑफ इंडियाशी बातचीत करताना पानेसर म्हणाला, 'कोहली रोनाल्डोप्रमाणे आहे. जेव्हाही रोनाल्डो मॅचेंस्टर युनायटेडकडून खेळतो, तेव्हा जगभरातील फुटबॉलप्रेमी तो सामना पाहतात. तसंच जेव्हाही टायगर वुड्स गॉल्फ टूर्नामेंट खेळतो, तेव्हाही प्रेक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्याचनुसार कोहलीला पाहण्यासाठीही मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे स्पॉन्सर्सना आनंदी ठेवण्यासाठी बीसीसीआय कोहलीला ड्रॉप करु शकत नाही.'
कोहलीची धावांसाठी धडपड
विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आलं नाहीये. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे.
आयसीसी कसोटी क्रमावारीच्या टॉप-10 मधून विराट बाहेर
आयसीसीनं नुकतीच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजाच्या क्रमावारीच्या टॉप-10 मधून विराट कोहली बाहेर पडलाय. तब्बल सहा वर्षानंतर विराट कोहली टॉ-10 मधून बाहेर पडलाय. इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या रिशेड्युल कसोटी सामन्यातही तो मोठी धावसंख्या करण्यास अपयशी ठरला. इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात विराट कोहलीला पहिल्या डावात 11 तर, दुसऱ्या डावात 20 धावा करता आल्या. परिणामी, आयसीसी कसोटी क्रमवारीत त्याची तीन स्थानांनी घसरण झाली असून तो सध्या 13 व्या स्थानावर पोहचलाय.
हे देखील वाचा-